Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

औरंगाबादच्या ‘संभाजी नगर’ नामकरणास संभाजी ब्रिगेडचे समर्थन

आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे 'संभाजी नगर' असे नामकरण झालेच पाहिजे.

January 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
vikas pasalkar

मुक्तपीठ टीम

 

अन्याय अत्याचाराच्या आणि गुलामीच्या स्मृती जतन करण्यापेक्षा आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण झालेच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारने निर्णय घ्यावा संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण समर्थन असेल, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले.

 

समस्त शिवप्रेमींच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४१व्या राज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे सहआयुक्त संदीप कदम, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी अधिकारी भैय्यासाहेब देशमुख, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मयूर शिरोळे, मंदार बहिरट, सचिन जोशी, मराठा टायगर फोर्सचे संदीप लहाने पाटील, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर विराज तावरे यांनी आभार मानले.

 

बारा मावळातील सप्तनद्यांच्या जलाने छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी इंग्रजी भाषेतून संवाद साधणारे संभाजी राजे युवकाना समजले पाहिजे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून चार ग्रंथ लिहिणारे संभाजी राजे आपल्या युवकांना समजले पाहिजे. संभाजी राजांनी विद्वात्ता इतकी मोठी होती की काशीवरून आलेल्या गागा भट्टाने समनयन नावाचा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला तेव्हा त्यांच वय अवघे १८ वर्षांचे होते. अशा गुणसंपन्न राजाच्या नावाने जे संघटन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे आहे त्या संभाजी ब्रिगेडचे आम्ही पाईक आहोत. याचा आम्हाला अभिमान असल्याचे विकास पासलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले.

 

या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे सहआयुक्त संदीप कदम यांनी जनतेला संभाजीराजे राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार बहिरट, सचिन जोशी, मयुर शिरोळे, श्रेयस खोपडे यांनी सहकार्य केले.


Tags: Aurangabadsambhaji brigadeSambhaji Nagarकेंद्रीय निरीक्षक विकास पासलकरसंभाजी ब्रिगेड
Previous Post

#व्हाअभिव्यक्त ‘सू’वर बोलू काही!

Next Post

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

Next Post
whatsapp

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!