मुक्तपीठ टीम
बऱ्याच दिवसांपासून अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेअरची समस्या सुरू आहे. आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली असून क्विक हील सिक्युरिटी लॅबच्या संशोधकांना जोकर मालवेअर प्ले स्टोअरवर उपस्थित असलेल्या काही अॅप्समध्ये आढळला आहे. या मालवेअरचे नाव जोकर असे आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून ते काढून टाकले असले तरी यूजर्सना सतर्क राहणे फार महत्वाचे आहे.
हे अॅप्स फसवणूक करू शकतात-
- यूजर्सने हे अॅप्स डाऊनलोड केले तर त्यामधील मालवेयर गुप्तपणे यूजर्सचा डेटा गोळा करतो आणि यूजर्सस न कळविता प्रीमियम सबस्क्रिप्शनची सदस्यता घेतो.
- म्हणजेच हे अॅप्स आपल्याला फसवू शकतात.
- या सर्व ८ अॅप्सची माहिती गुगलला देण्यात आली होती, त्यानंतर त्यांना प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे.
हे अॅप्स त्वरित हटवा
Auxiliary Message
Fast Magic SMS
Free CamScanner
Super Message
Element Scanner
Go Messages
Travel Wallpapers
Super SMS
असे कार्य करतात हे अॅप्स-
- अहवालानुसार, अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर ते यूजर्सकडून वेगवेगळ्या परवानग्या विचारते.
- जोकर मालवेयर यूजर्सच्या डिव्हाइसमधून एसएमएस, संपर्क यादी आणि डिव्हाइस माहिती चोरतो.
- हे नंतर जाहिराती संबंधित वेबसाइटशी इन्टरॅक्ट केरेल आणि यूजर्सच्या माहितीशिवाय प्रीमियम सेवेची सदस्यता घेईल.
- या मालवेयर अॅप्लिकेशन्सचा गूगल प्ले स्टोअरवरील स्कॅनर ,अॅप्लिकेशन्स, वॉलपेपर अॅप्लिकेशन, मेसेजेस अॅप्लिकेशन्सवरही प्रसार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
- अशा परिस्थितीत आम्ही यूजर्सना असे कोणतेही अॅप्स डाउनलोड न करण्याचा सल्ला देतो.