मुक्तपीठ टीम
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स बनले आहेत अमेरिकेतील ‘सर्वात मोठे शेतकरी’. अमेरिकेच्या १८ राज्यांत त्यांनी एकूण २ लाख ४२ हजार एकर शेत जमीन खरेदी केली आहे.
एका भूमी अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेट्सने केवळ लागवडीच्या जागेवरच गुंतवणूक केली नाही तर इतर प्रकारच्या जमीनही विकत घेतल्या. यात हॉर्स हैवेन हिल्स क्षेत्रात खरेदी केलेल्या १४,५०० एकर जमिनीचा देखील समावेश आहे. यासाठी त्यांनी १,२५१ कोटी रुपये खर्च केले आहेत. एकंदरीत त्यांनी आतापर्यंत एकूण २,६८,९८४ एकर जमीन खरेदी केली आहे.
६५ वर्षीय बिल गेट्सने इतकी शेती जमीन का विकत घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही जमीन ‘इन्वेस्टमेंट एंटिटी कास्केड’ फर्ममार्फत खरेदी केली गेली आहे. २०१८ मध्ये बिल गेट्सने जेव्हा या जमीन घेतल्या तेव्हा त्या अमेरिकेत सर्वाधिक दराने खरेदी केल्या गेल्या होत्या.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने २००८ मध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यात त्यांनी म्हटले होते की, “आफ्रिका आणि जगातील अन्य विकसनशील क्षेत्रातील लहान शेतकर्यांना ते २,२३८ कोटी रुपयांची मदत देत आहेत, जेणेकरून गरीब शेतकरी उपासमारीने आणि दारिद्र्यातून बाहेर येतील.”