मुक्तपीठ टीम
जयपूरच्या एचओपी इलेक्ट्रिक मोबिलिटी या इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनीने २ नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलर बाजारात लॉन्च केल्या आहेत. एचओपी एलईओ आणि एचओपी एलवायएफ असे या दोन इलेक्ट्रिक टू व्हिलरची नावे आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी आणखी ५ इलेक्ट्रिक टू व्हिलर लॉन्च करणार आहे.
या इलेक्ट्रिकल टू व्हिलर्सना एकदा चार्ज केले की १२५ किमी पर्यंत रेंज मिळणार आहे. त्यांना ७२ व्ही आर्किटेक्चर, हाय परफॉर्मेंस मोटर आणि १९.५ लीटरच्या बूट स्पेससह लॉन्च केले आहेत. याव्यतिरिक्त यात इंटरनेट, जीपीएस आणि मोबाइल अॅपसारखे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
एचओपी एलईओचे फीचर्स
- एचओपी एलईओ ही इलेक्ट्रिक टू व्हिलर एलईओ बेसिक, एलईओ आणि एलईओ एक्सटेंडेड अशा तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
- या दुचाकींची रेंज १२५ किमी असून टॉप स्पीड ताशी ६० किमी आहे.
- तसेच ड्युअल २ एक्स लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
एचओपी एलवायएफचे फीचर्स
- एचओपी एलवायएफ ही इलेक्ट्रिक टू व्हिलर एलवायएफ बेसिक, एलवायएफ आणि एलवायएफ एक्सटेंडेड अशा तीन वेरिएंडमध्ये उपलब्ध आहे.
- या दुचाकींची रेंज १२५ किमी असून टॉप स्पीड ताशी ५० किमी आहे.
- तसेच टू व्हिलर त ड्युअल २ एक्स लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
- एलवायएफ एक्सटेंडेड इलेक्ट्रिक टू व्हिलर च्या इलेक्ट्रिक मोटरची मेकॅनिकल पॉवर २ केडब्ल्यू आहे.
किंमत
- एचओपी एलईओची किंमत ७२,५०० रुपये आहे.
- तर एचओपी एलवायएफची किंमत ६५,५०० रुपये आहे.