Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न, तरीही घ्यावी दक्षता: छगन भुजबळ

June 19, 2021
in सरकारी बातम्या
0
chhagan bhujbal (1)

मुक्तपीठ टीम

गेले अनेक महिने शासन प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला असून आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

chhagan bhujbal (5)

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजनांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. उत्कर्ष दुधडीया, डॉ. आवेश पल्लोड, डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

chhagan bhujbal (2)

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण ६२ ऑक्सिजन प्रकल्पातून साधारण १५५ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मीती होणार असून यापेक्ष‍ा अधिक ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. दुसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तयार झालेली प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, त्या अनुषंगाने आवश्यक असणारा औषध साठा करण्याचे नियोजन करण्यात येवून दुपटीने सर्वसमावेशक तयारी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री  भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

chhagan bhujbal (4)

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असून शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या मॉल्स मधील कर्मचाऱ्यांची आरटीपीआर चाचणी करणे आवश्यक असून तेथील कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावेत. तसेच तेथे जास्त गर्दी होणार नाही याकरिता तेथील दुकानदारांनी दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

chhagan bhujbal (3)

जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री यांना सादर करतांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मीती क्षमता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या देखील काही प्रमाणात कमी होत आहे. महानगरपालिका रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालकमंत्री यांना दिली आहे.


Tags: chhagan bhujbalcoronapositivity rateकोरोनाछगन भुजबळपॉझिटिव्हिटी दर
Previous Post

‘आघाडी’च्या ‘हेराफेरी’मुळे ओबीसी आरक्षण रद्द – ॲड.आशिष शेलार

Next Post

आज नवी मुंबईत शून्य नवे रुग्ण! सहा जिल्ह्यांचे टेन्शन कमी झालं तर महाराष्ट्र निम्म्यापेक्षा कमी!!

Next Post
MCR 1-5-21

आज नवी मुंबईत शून्य नवे रुग्ण! सहा जिल्ह्यांचे टेन्शन कमी झालं तर महाराष्ट्र निम्म्यापेक्षा कमी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!