मुक्तपीठ टीम
अशक्य काही नसतंच. गरज असते ती प्रतिभा, परिश्रम आणि प्रामाणिकपणाची. टोकियो ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारतीय हॉकी संघात निवड झालेला सुरेंद्र कुमार अशाच जिद्दीचे प्रतिक आहे. त्याला वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांनी हॉकी स्टिक घेऊन देण्यास नकार दिला होता. त्याच सुरेंद्र कुमारने आज आपल्या वडिलांचे आणि देशाचे नाव जगात गाजवले आहे. , सुरेंद्र कुमारने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या भारतीय हॉकी संघात स्थान मिळवले आहे.
वडिलांच्या नकारानंतरही मिळवली हॉकी स्टिक आणि ख्याती!
- सुरेंद्र कुमारचे हॉकीप्रेम जबरदस्त आहे.
- वडिलांनी नकार दिल्यावर हॉकी स्टिक घेण्याची जिद्द असणाऱ्या सुरेंद्रने वडिलांच्या मित्राला विनवणी केली.
- तेव्हा वडिलांच्या मित्राने सुरेंद्र आणि त्याच्या भावाला सायकलवर नेले आणि हॉकी स्टिक घेऊन दिली.
- वडिलांच्या मित्राच्या मदतीने कुरुक्षेत्राच्या द्रोणाचार्य स्टेडियममध्ये गवताच्या मैदानात पहिल्यांदा उतरणारा सुरेंद्र आता एक जबरदस्त हॉकी खेळाडू आहे.
- सुरेंद्र हा त्याच्या संघात आपल्या उत्तम शैलीने बचावपटूची जबाबदारी सांभाळतो.
हॉकी टीमचं लक्ष्य सुवर्ण पदकाचंच!
- गेल्या अनेक महिन्यांपासून बंगळुरुच्या शिबिरात सराव करीत असलेल्या, भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य सुरेंद्रने सांगितले की, “आमच्या संघाचे लक्ष्य देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपद मिळवण्यासाठी संपूर्ण टीम दिवसरात्र सरावात व्यस्त आहे.”
- कुरुक्षेत्रच्या सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या सुरेंद्रचे वडील शेतकरी मलखान सिंह यांनी त्यावेळी हॉकी स्टिकसाठी नकार दिला होता, मात्र आता त्यांना आपल्या लेकाचा अभिमान आहे. सुरेंद्रची आई नीलमही आपल्या मुलाच्या खेळाबद्दल अभिमानाने भरभरून सांगते.
सुरेंद्रची उल्लेखनीय कामगिरी
- २०१० मध्ये सुरेंद्रने राय स्कूल येथे झालेल्या अंडर १९ स्पर्धेत प्रथमच खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली.
- या कामगिरीच्या जोरावर सुरेंद्रची २०११ मध्ये ज्युनियर नॅशनल गेम्ससाठी राज्य संघात निवड झाली.
- पुण्यात झालेल्या या चॅम्पियनशिपमध्ये सुरेंद्रने जबरदस्त कामगिरी केली.
- स्पर्धा जिंकून राज्यात मागील ५० वर्षातील विक्रम मोडला आणि यश मिळवले.
- यानंतर सुरेंद्रची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली.
- २०१७ मध्ये आशिया चषकात सुवर्ण
- २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य
- २०१६, २०१८ मध्ये आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्ण
- चॅम्पियन्स ट्रॉफी २०१६, २०१८ मध्ये रौप्य
- सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले.