Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ, मुंडे, पटोले, राठोड एकत्र! वडेट्टीवारांचा पुढाकार!!

June 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
obs reservation

मुक्तपीठ टीम

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी पक्षभेद विसरून सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र येणार आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात येणार आहे.

 

चिंतन बैठकीचे आयोजन

  • ओबीसी आरक्षण धोक्यात येण्यावर मार्ग काढण्यासाठी तसेच ओबीसींच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नेमकं काय करावं, यावर विचार करावा यासाठी २६ आणि २७ तारखेला चिंतन शिबिर आयोजित केले असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
  • या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत.
  • या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार-

  • ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे.
  • त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत.
  • कोर्टाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत.
  • तसेच कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

४० ते ५० हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला-

  • ओबीसींचा इंम्पेरीयल डेटा मागण्यासाठी केंद्र सरकारला दोन पत्र लिहिली आहेत.
  • पण केंद्राकडून तो डेटा मिळाला नाही.
  • मुख्यमंत्र्यांनीही इम्पेरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे.
  • इंम्पेरिकल डेटा उपलब्ध न झाल्याने राज्यातील ४० ते ४५ हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • यात महानगरपालिका, सहकार क्षेत्र ते ग्रामपंतायत आणि इतर जागा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत.

Tags: chhagan bhujbalMinister Vijay VadettiwarOBC reservationpankaja mundesanjay rathodओबीसी आरक्षणछगन भुजबळनाना पटोलेपंकजा मुंडेवनमंत्री संजय राठोडविजय वडेट्टीवार
Previous Post

अनवाणी धावूनही जग गाजवलं…शत्रूनंही गौरवलं…फ्लाईंग शिख!

Next Post

“मी गट विकास अधिकारी…भिकारी! मी तहसिलदार…बेरोजगार!”

Next Post
mpsc (8)

“मी गट विकास अधिकारी...भिकारी! मी तहसिलदार...बेरोजगार!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!