मुक्तपीठ टीम
सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष उलटले आहे. त्याचबरोबर सीबीआय चौकशीला ३१० दिवस झाले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, दिल्लीतील एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्यालाही २५० दिवस झाले आहेत. तरीही सीबीआय सत्य का दडवत आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
सुशांत प्रकरणी सीबीआयवर दबाव
- सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल?
- सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे?
- सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे.
अँटेलिया स्फोटकांप्रकरणीही संशय
- त्याचप्रमाणे जर अँटेलिया कट रचणारे वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही?
- काही गुप्त करार झाला आहे का?
- परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही?
- एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?
जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणालेत.