मुक्तपीठ टीम
जर तुम्ही आयटीआयचा कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने १५०० अॅप्रेंटिसशिपच्या जागांसाठी अर्ज मागविले आहेत. ही थेट भरती आहे. म्हणजेच कोणतीही परीक्षा दिली जाणार नाही. संधी फक्त गुणवत्तेच्या आधारे उपलब्ध असतील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
कुठे आणि कसा करावा अर्ज
- कोलफील्ड्समधील अॅप्रेंटिसशिपसाठी एनसीएलच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज १० जून २०२१ पासून सुरू झाले आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला नॅशनल अॅप्रेंटीशिप पोर्टल apprenticeshipindia.org वर नोंदणी करावी लागेल.
- अर्जात काही अडचण आल्यास आपण सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळेत ०७८०५-२५६५७३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता. किंवा rectt.ncl@coalindia.in वर ईमेल पाठवा.
शैक्षणिक पात्रता
वेल्डरसाठी: – 8 वी इयत्ता आणि एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर ट्रेडमध्ये आणि आयटीआय पास.
इलेक्ट्रीशियनमध्ये १० वी. पास आणि इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये आयटी पास
फिटर – दहावी आणि फिटर ट्रेडमध्ये आयटी उत्तीर्ण.
मोटर मेकॅनिक – दहावी उतीर्ण आणि मोटर मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण.
वयोमर्यादा
- किमान १६ वर्षे ते जास्तीत जास्त २४ वर्षे.
- ओबीसी (एनसीएल) प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७ वर्षे आहे.
- एससी, एसटीसाठी २९ वर्षे आहे.
- अपंग उमेदवारांना १० ते १५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेश आयटीआय आणि मध्य प्रदेश आयटीआय (एमपी आयटीआय) संस्थांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी
एनसीएलच्या अधिकृत वेबसाइट nclcil.in वरून माहिती मिळवू शकता.