मुक्तपीठ टीम
आषाढी वारीच्या नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत राज्यातील दहा मानाच्या पालख्यांसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावेळी १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना पायी जाण्याची परवानगी नसेल तर त्यांना एसटी बसेसने जावे लागेल. त्यासाठी खास २० बसची सोय असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती आज दिली.
पायी वारी नाही, पण मानाच्या दहा पालख्यांना परवानगी
- मानाच्या दहा पालख्या २० एसटी बसेसमधून पंढरपुरात पोहोचतील.
- पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांसाठी वैद्यकिय चाचणी अनिवार्य असेल.
- कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे.
- देहू आणि आळंदी पालखीबरोबर १०० जणांना जाण्यास परवानगी आहे.
- इतर आठ पालख्यांसोबत ५०जणांना परवानगी असेल.
रिंगण-रथोत्सावाला निर्बंधासह परवानगी
- वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.
- रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच तेथे इतरांना परवानगी नाही.
- त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
भाविकांसाठी मंदिर बंद
- भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असणार आहे.
- केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.
- त्यामुळे इतर भाविकांनी पंढरपुरात मंदिर परिसरात गर्दी करु नये.
मानाच्या दहा पालख्या कोणत्या?
- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
- संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
- संत सोपान काका महाराज ( सासवड )
- संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
- संत तुकाराम महाराज ( देहू )
- संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
- संत एकनाथ महाराज ( पैठण )
- रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
- संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
- संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )