मुक्तपीठ टीम
येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्वत:चा टर्म इंश्युरन्स उतरवण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोनामुळे आता टर्म इंश्युरन्स घेणं यापुढे आधीपेक्षा जरा कठीण होणार आहे. बर्याच विमा कंपन्यांनी आता टर्म इंश्युरन्ससाठी कोरोना लसीची अट ठेवली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांना अँटी-कोरोना लस मिळाली आहे त्यांनाच टर्म इंश्युरन्सचा लाभ मिळेल.
लसीकरण ही पहिली अट
मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवल्यावर पॉलिसी देत आहे. त्याचप्रमाणे टाटा एआयए केवळ प्रत्येक वयोगटातील अशा लोकांना टर्म पॉलिसी जारी करीत आहे ज्यांनी कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतला असेल. पॉलिसीधारकांना उच्च स्तरावरची आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी ते हे सुनिश्चित करतात की त्यांचे हित नेहमीच सुरक्षित केले जाऊ शकते, असे टाटा एआयएच्या प्रवक्त्याने नमूद केले.
नवीन कायदे
- याआधीही विमा कंपन्यांनी टर्म इंश्युरन्स पॉलिसी देण्यासाठी अनेक अटींसह काटेकोरपणा दर्शविला आहे.
- जीवन विमा कंपन्यांच्या नव्या नियमांनुसार आता होम क्वारंटाईनच्या माध्यमातून तुम्ही जर कोरोना निगेटिव्ह झाला असाल तरीही पुढील तीन महिने तुम्ही टर्म इंश्यरन्स घेऊ शकत नाही
- याशिवाय टेली मेडिकलऐवजी टर्म इन्शुरन्स कंपन्या आता संपूर्ण वैद्यकीय चाचणीवरच भर देत आहेत.