मुक्तपीठ टीम
आटपाडी तालुक्याचा अन्याय दुर करणार, येत्या विधानसभा निवडणूकीत मी राष्ट्रवादीचा उमेदवार! म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा ज्येष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील यांनी करून तालुक्यातील सर्वांनी माझ्या पाठीशी एकजूटीने उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्ष स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण, शरद पवारांचे जनाधार असलेले नेतृत्व, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढीस लागलेला पक्ष, दुष्काळग्रस्तांना पाणी मिळावे म्हणून सर्व प्रथम राजारामबापुंनी दिलेला खुजगांवचा लढा यावरही रावसाहेबकाका पाटील यांनी भाष्य केले.
अर्थकारण बदलून टाकणारी दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वत्र वाढीस लागलेली डाळींब क्रांती, शेता शिवारात जागोजागी दिसणारी शेततळी ही शरद पवार साहेबांची देणगी आहे. कृष्णा खोऱ्यासाठी जयंत पाटील यांनी दिलेले मोठे योगदान, वेळोवेळी लढून ही न मिळणारे वेगवेगळ्या पाळ्यां वेळचे पाणी, याउलट न मागता कृष्णेचे वाहून जाणाऱ्या पाण्याची दुष्काळग्रस्तांसाठी जयंतराव पाटील यांनी केलेली खास व्यवस्था, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी – डॉ . भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालचा पाण्यासाठीचा प्रदिर्घ लढा, टाळले जाणारे भुसंपादन आणि पाण्याची ४० टक्के होणारी बचत यातून भारतातला पहिला पथदर्शक बंदिस्त पाईपलाईनचा प्रयोग ही भारत पाटणकरांची मांडणी सर्व दूर उपयुक्त ठरणारी असून या सर्व बाबींचा उहापोह पक्षाला व कार्यकर्त्यांना मदत करणाराच ठरू शकतो अशा भावना राष्ट्रवादीचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापु पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
देशातल्या १३ राज्यात विस्तारलेल्या राष्ट्रवादीने ४ राज्यात लोकप्रतिनिधी निवडून आणले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून साडे सोळा वर्षे राज्याच्या आणि १५ वर्षे केंद्रातल्या सत्तेत राहीलेल्या राष्ट्रवादीची कामगिरी नेत्रदीपक आहे. देशाचे पंतप्रधानपदी शरद पवार आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील यांना पाहता यावे यासाठी कोट्यावधी कार्यकर्त्यांच्या सदिच्छा सत्यात येतील अशी आशा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी व्यक्त करून, प्रत्येक बुथच्या मजबूत बांधणीतून सर्वांनी एकवटत जयंत पाटील साहेबांच्या या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सर्व स्तरावर मजबूत बनवावी असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी केले.
राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे कार्य केल्यास महत्वाची पक्ष मजबूती होणार असल्याचे मत वसंतदादा जिल्हा दुध संघाचे चेअरमन, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते विष्णूपंत पाटील यांनी व्यक्त करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचा तालुक्याच्या विकासासाठी उपयोग करून घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
सर्वांचे स्वागत, प्रास्तावीक करताना राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी आटपाडी तालुक्यात येणाऱ्या जि.प. आणि पं. सं च्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताना पक्ष, संघटनात्मक बांधणीसाठी सर्वांनी कामाला लागावे अले आवाहन केले.
पक्षाचे युवकचे प्रदेश सचिव एन .पी . खरजे यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील, युवा नेते वैभवकाका पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बैठका घेत सर्वांनी वाटचाल करण्याचे आवाहन केले.
आता पक्षात असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनाच उद्याच्या जि.प. पं. स. निवडणूकीत प्रथम प्राधान्याने संधी देण्याची मागणी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिताताई पाटील यांनी केली तर तालुक्यात ८५० महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो भगिनींच्या संपर्कात मी आहे. या पन्नास टक्केच्या महिला ताकदीला, त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी पक्षाच्या वरिष्टांनी मदत केल्यास त्यांच्या प्रश्न, समस्यांचा, उकल केल्यास ही महिला ताकद राष्ट्रवादीला घराघरात नेल्याशिवाय राहणार नाही, असे वास्तववादी आश्वासक मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा अश्विनीताई कासार – अष्टेकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेड्यांस वंदन करण्यात आले. सलामी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर यांच्या विजयाच्या घोषणा देत एकमेकांना लाडू चारत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, कल्लाप्पा नाना कुटे, शेटफळेचे ज्येष्ट नेते संभाजीराव पाटील सर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका उपाध्यक्ष शशिकांत भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या सुजाता टिंगरे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, राष्ट्रवादीचे आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील, पक्षाचे तालुका सरचिटणीस समाधान भोसले, विजयराव पुजारी, सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे, उपाध्यक्ष अभिजित होळे निंबवडे, अभिजित मेटकरी निंबवडे, दिघंची शहर अध्यक्ष प्रशांत गवळी, महिला राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा सौ आशाताई देशमुख, वैशालीताई सावंत, महिला आटपाडी शहर अध्यक्षा आस्मा शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष मनोज सुतार, नितीन डांगे, रोहीत सावंत इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी यांनी आभार मानले.