मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळातील महामारीत अनेक चांगली माणसं चांगलं कार्य करत आहेत. अनेक जण गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बिहारमधील पाट मुकेश हिसारिया हे देखील समाजासाठी धडपडणाऱ्या चांगल्या माणसांपैकी एक आहेत. मुकेश आपल्या रक्तदान सेवेमुळे ब्लडमॅन म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात लोकांना मदत केल्याबद्दल डेटॉल कंपनीने मुकेश यांचा गौरव केला आहे. डेटॉलने त्यांचा अवर प्रोटेक्टर पुरस्काराने सन्मान केला आहे. अमिताभ बच्चन यांनीही मुकेशच्या सामाजिक कार्यांसाठी त्यांचं कौतुक केले आहे.
मुकेश यांनी आतापर्यंत रक्त देऊन ५०हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत गरीब कुटुंबातील ४८८ मुलींचा जनतेच्या मदतीने विवाह करून दिला आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केला, त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे डेटॉलने त्यांचा गौरव केला. मात्र, मुकेशने त्यांचे छायाचित्र डेटॉलच्या पॅकवर वापरण्यासाठी एक अट घातली आहे. डेटॉल उत्पादक कंपनी प्रॉक्टर अँड गँबलने चार थॅलिसिनियाग्रस्त मुलांचा वेल्लोरमधील उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची ही अट मुकेश यांच्या सेवाभावी वृत्तीच दाखवते. त्यांच्या कार्याला मुक्तपीठचा सलाम!
डेटॉलच्या प्रॉडक्ट पॅकवर मुकेश यांचा फोटो
१. डेटॉल कंपनीने मुकेश यांच्याबरोबर करार केला आहे.
२. त्याअंतर्गत त्यांचा फोटो डेटॉल उत्पादनांच्या पॅकवर दिसणार आहे.
३. समाजासाठी संकट काळात त्यांनी केलेले कार्य यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
४. आपली कथा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी डेटटॉलने मुकेश यांच्यासोबत ६ महिन्यांचा करार केला आहे.
५. डेटॉलने त्याच्या फोटोसह डेटॉलचा एक पॅक आणि प्रशस्तीपत्र मुकेश यांना पाठवले आहे.
मुकेश अनेक सन्मानाचे ठरले मानकरी
- मुकेश हिसारिया हे एक व्यापारी आहेत.
- २०१३ मध्ये कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोमध्ये त्यांना बोलावले होते.
- या शोमध्ये त्यांना बोलवण्याचे कारण त्यांचे समाज कार्य होते.
- मुकेशने आतापर्यंत रक्त देऊन ५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
- त्याशिवाय आतापर्यंत गरीब कुटुंबातील ४८८ मुलींचा जनतेच्या मदतीने विवाह करून दिला आहे.
- मुकेश अशा मुलींसाठी सामुहिक विवाहसोहळा आयोजित करतात ज्यांना आपल्या मुलींचे लग्न परवडत नाही.
अमिताभ बच्चन यांच्या प्रेरणेने ब्लड बँक
• कौन बनेगा करोडपती शोमध्ये अमिताभ यांनी मुकेश यांचे कौतुक केले होते. त्याच वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना ब्लड बँक तयार करण्यास सांगितले होते.
• एक अशी ब्लड बँक कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
• त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले होते की, खर्चापैकी ५० टक्के निधी त्यांच्या वतीने असेल आणि ५० टक्के निधी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या वतीने देण्यात येईल.
• शाहरुख खाननेही मुकेश यांना २०१६ मध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आमंत्रित केले होते.
• २०१७ मध्ये कपिल शर्मानेही त्याला आपल्या शोमध्ये बोलावले होते.
१२५ मृतदेहांवरही अंत्यसंस्कार
• मुकेश यांनी कोरोनाच्या दुसर्या लाटेत १२५ मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत.
• हे मृतदेह ज्यांचे होते त्यांचे कुटुंबीय शेवटचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढेही येत नव्हते.
• असे बरेच लोक मुकेश यांच्याशी संपर्क साधत असत.
• अशा सर्व मृतदेहांवर मुकेश यांनी पूर्ण आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले.
• इतकेच नाही तर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातूनही घरातील सदस्यांना शेवटचे दाखवले गेले.
डेटॉल कंपनीला मुकेश यांची अट
• जेव्हा डेटॉल कंपनीने त्यांच्याशी या सन्मानाबद्दल बोलणी केली, तेव्हा मुकेश यांनी त्यांची अट समोर ठेवली.
• थॅलेसीमिया ग्रस्त ४ मुलांच्या उपचारासाठी वेल्लोरमध्ये राहण्याचा खर्च उचलण्याची मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे.
• डेटॉलच्या पॅकवर त्यांचा फोटो वापरला जात आहे या बदल्यात मुकेश यांनी ही मागणी केली आहे.
• कंपनीने यावर विचार करण्याचे म्हटले आहे.
• मुकेश हे थॅलेसीमियाग्रस्त मुलांच्या उपचारासाठी काम करतात.
• थॅलेसीमिया असलेल्या मुलांना दर १५ दिवसांनी रक्ताची आवश्यकता असते.
• त्याचा खर्च लाखोंमध्ये आहे. यामुळेच मुकेश अशा मुलांना मदत करतात.
पाहा व्हिडीओ: