मुक्तपीठ टीम
आज राज्यातील नवीन रुग्णांची संख्या पुन्हा खाली गेली. आज १० हजार २१९ नवे रुग्ण सापडले असतानाच त्याच्या दुपटीपेक्षा जास्त २१ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर पोहचले आहे. आजची सर्वात कमी नवी रुग्णसंख्या ही पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात फक्त ४ एवढी नोंदवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारात १ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मराठवाड्यातील हिंगोलीत १० आणि नांदेड जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १०,२१९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,६४,३४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १५४ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,७४,३२० सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६६,९६,१३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,४२,००० (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,५११ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,८९५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,९४८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,११० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०१,०९७ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,६५८ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १० हजार २१९ (कालपेक्षा ३ हजार४४० कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,४२,००० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ७३०
२ ठाणे ११४
३ ठाणे मनपा ८४
४ नवी मुंबई मनपा ६८
५ कल्याण डोंबवली मनपा १२५
६ उल्हासनगर मनपा ७
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ८४
९ पालघर ४८
१० वसईविरार मनपा १२३
११ रायगड ३९३
१२ पनवेल मनपा ११४
ठाणे मंडळ एकूण १८९५
१३ नाशिक १३८
१४ नाशिक मनपा १४०
१५ मालेगाव मनपा १
१६ अहमदनगर ४५२
१७ अहमदनगर मनपा ३४
१८ धुळे ५
१९ धुळे मनपा ७
२० जळगाव १५१
२१ जळगाव मनपा ९
२२ नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण ९४८
२३ पुणे ४४६
२४ पुणे मनपा २८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९९
२६ सोलापूर ३३५
२७ सोलापूर मनपा १४
२८ सातारा ११५२
पुणे मंडळ एकूण २४३५
२९ कोल्हापूर १०१७
३० कोल्हापूर मनपा ३८१
३१ सांगली ५९४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८४
३३ सिंधुदुर्ग ५६२
३४ रत्नागिरी ५४८
कोल्हापूर मंडळ एकूण ३१८६
३५ औरंगाबाद १३७
३६ औरंगाबाद मनपा ६४
३७ जालना ५७
३८ हिंगोली १०
३९ परभणी २८
४० परभणी मनपा १५
औरंगाबाद मंडळ एकूण ३११
४१ लातूर २५
४२ लातूर मनपा २०
४३ उस्मानाबाद १३३
४४ बीड १५५
४५ नांदेड १२
४६ नांदेड मनपा २
लातूर मंडळ एकूण ३४७
४७ अकोला २८
४८ अकोला मनपा ३७
४९ अमरावती १३४
५० अमरावती मनपा ५६
५१ यवतमाळ ११२
५२ बुलढाणा ६३
५३ वाशिम ३६
अकोला मंडळ एकूण ४६६
५४ नागपूर ८०
५५ नागपूर मनपा ४२०
५६ वर्धा १७
५७ भंडारा १५
५८ गोंदिया ४
५९ चंद्रपूर ५८
६० चंद्रपूर मनपा ५
६१ गडचिरोली ३२
नागपूर एकूण ६३१
एकूण १० हजार २१९
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे. हे १८६ मृत्यू, यवतमाळ-४९, पुणे-३५, कोल्हापूर-२५, नाशिक-१५, ठाणे-१४, अहमदनगर-११, अकोला-८, औरंगाबाद-७, उस्मानाबाद-५, सिंधुदुर्ग-५, चंद्रपूर-३, लातूर-२, रायगड-२, जालना-१, नागपूर-१, सांगली-१, सोलापूर-१ आणि पालघर-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ७ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.