मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात निर्बंध लादण्यात आले होते. विमान प्रवास करण्यासाठीही काही कडक निर्बंध हे लागू करण्यात आले आहेत. आता कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे काही बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्याचा एक भाग म्हणून लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी आता आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नसणार आहे. अर्थात त्यासाठी राज्यांशीही चर्चा केली जाणार आहे.
राज्य आणि इतर यंत्रणांशी चर्चा करुन निर्णय
• सध्या देशांतर्गत विमान प्रवासासाठी प्रवाशांना आरटीपीसी चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे.
• नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाबरोबर काही मंत्रालयांची संयुक्त टीम या यंत्रणेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी चर्चा करीत आहे.
• मात्र, हा निर्णय केवळ नागरी उड्डाण मंत्रालयाचा नाही.राज्य सरकारांशीही बालावं लागेल.
• आरोग्य हा राज्याचा मुद्दा आहे. राज्यात प्रवेश करताना प्रवाशीकडून आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल विचारणे पूर्णपणे त्या राज्याच्या अखत्यारीत येते.
• सरकारबरोबर काम करणार्या विविध एजन्सीज आणि आरोग्य तज्ज्ञही यात सहभागी होतील.
• सर्व प्रवाशांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.