मुक्तपीठ टीम
ठाणे-मुंबईच्या सीमेवर आज एका आलिशान फॉक्सवॅगन कारला आग लागली. आग लागताच चालकाने कार बाजूला घेतली. त्यामुळे इतर वाहनांचा धोका टळला. तसंच जीवितहानी झाली नाही. त्यानंतर पोलीस पोहचले. ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने धोका पत्करत पेटलेल्या कारवर पाण्याचा मारा करत आग विझवली.
ठाणे ईस्टर्न एक्सप्रेस मार्गावर आज फॉक्सवॅगन व्हेन्टो कारने अचानक पेट घेतला. मुलुंड टोल नाका परिसरात MH ०२ EE ४३५० या नंबरच्या कारला भयानक आग लागली. चालकाने वेळीच कार बाजूला घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पोलीस अधिकारी वेळीच घटनास्थळी पोहोचले.
माहिती मिळताच अग्निशामन दलाने घटना स्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. आरडीएमसी, मुंबई फायर ब्रिगेड आणि ठाणे अग्निशमन दललाने जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये कोणतीही दुर्घटना नाही, कोणालाही इजा नाही. पोलीस आणि अग्निशामन दलाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आहे.