मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. अलीकडेच, कंपनीने आपले गोपनीयता धोरण अपडेट केले, ज्यामुळे युजर्स खूप नाराज आहेत. गोपनीयता धोरणात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरचे नाव “रिड लेटर” आहे.
कंपनी लवकरच हे फीचर आपल्यासाठी आणणार आहे. कंपनी अर्काईव्हड चॅट काढून टाकण्याच्या तयारीत आहे. रिड लेटर फीचर एक चांगला पर्याय असू शकेल असा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या २.२१.२.२ बीटा व्हर्जनमध्ये सादर केले जाईल.
सध्या आपण एखादी व्यक्ती किंवा गृपमधील चॅट अर्काईव्हड केल्या की आपली चॅट अर्काईव्हड चॅट मध्ये लपवली जाते. अर्काईव्हड चॅटमध्ये एखादा नवीन मॅसेज आला तर ती चॅट आपोआप आपल्या व्हॉट्सअॅप चॅटच्या वरच्या क्रमांकावर दिसते. कधीकधी यामुळे युजर्सना खूप त्रास होतो. या समस्या सोडवण्यासाठी कंपनीचे नवीन फीचर रिड लेटर उपयुक्त ठरेल. कंपनीला या नवीन फीचरसह हे अडथळे दूर करायचे आहेत.
“रिड लेटर” फीचर नेमक कसं:
जेव्हा हे नवीन फीचर सुरु केले जाईल तेव्हा रिड लेटर या विभागात चॅटमध्ये आलेले कोणतेही नवीन संदेश आले तर ते त्याच विभागात राहतील. अशा वेळेस, जर त्या ग्रुपमध्ये नवीन संदेश आला तर युजर्सना कोणतीही सूचनासुद्धा मिळणार नाहीत. रिड लेट फीचरच्या श्रेणीतील सर्व चॅट नोटिफीकेशन बंद केल्या जातील.