मुक्तपीठ टीम
कोरोना काळात सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. निर्बंधामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी मोठ्या प्रमाणात सायकलींची मागणी वाढू लागली. अनेकांनी सार्वजनिक वाहनांना पर्याय म्हणून सायकलने प्रवास करायला सुरूवात केली. सायकल ही पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाश्वत, सुरक्षित तसेच आरोग्यासाठी उत्तम आहे. गेल्या वर्षी २५ जून २०२० रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत इंडिया सायकल्स 4 चेंज आव्हान सुरू केले. आता या आव्हानाला देशातील अनेक शहरांमध्ये गती मिळायला सुरूवात झाली आहे.
इंडिया सायकल्स4चेंजचे आव्हान काय?
• भारतातील शहरी भागात सायकलींचा वापर जास्तीत जास्त वाढवणे.
• इंडिया सायकल 4 चेंज आव्हानामुळे १०७ शहरांनी सायकलिंग क्रांतीचा भाग म्हणून नोंदणी केली.
• ४१ शहरांनी सायकल स्नेही शहर बनवण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण, चर्चा, पॉप-अप सायकल लेन, सुरक्षित आसपासचा परिसर, मोकळ्या रस्त्यांवरचे कार्यक्रम, सायकल रॅली किंवा ऑनलाइन अभियान यासाठी पुढाकार घेतला.
• मोहिमेचा भाग म्हणून शहरांनी ४०० किमी मुख्य मार्ग आणि जवळपास ३५०० कि.मी.हून अधिक आसपासच्या रस्त्यांवर काम सुरु केले.
• इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) च्या सहकार्याने स्मार्ट सिटीज मिशनने १०७ शहरांना विविध सायकलिंग उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल आणि इतर क्षमता निर्मिती उपक्रमांचे आयोजन केले.
इंडिया सायकल्स4चेंजचे उपक्रम
• पिंपरी चिंचवड, कोहिमा, ग्रेट वारंगल, नागपूर, पणजी आणि इतर अनेक शहरांमध्ये रॅली आणि सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले ज्यात हजारो सायकली रस्त्यावर धावल्या.
• नाशिक, न्यू टाउन कोलकाता आणि बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये वृद्ध महिलांसाठी सायकल प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यांचा सायकल चालवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यात आला.
पाहा व्हिडीओ: