मुक्तपीठ टीम
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका दिवसात ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले आहे. राहुल गांधींनी अनफॉलो केलेल्या ट्विटरकरांमुळे त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते, काही जवळच्या व्यक्ती आणि पत्रकारही आहेत. त्यांनी अनेकांना थेट अनफॉलो केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राहुल गांधींनी अनफॉलो केलेल्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त आणि अल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
राहुल गांधींनी कोणाला अनफॉलो केले?
• राहुल गांधींनी २८१ लोकांना अनफॉलो केले आहे.
• त्यांनी अनफॉलो केलेल्यांमध्ये जवळचे सहकारी अलंकार सवाई, के. बी. बायजू, निखिल आणि निवेदिता अल्वा, कौशल विद्यार्थी यांच्यासारख्यांचा समावेश आहे.
पत्रकारांनाही केले अनफॉलो
- राजदीप सरदेसाई
- बरखा दत्त
- प्रतिक सिन्हा
राहुल गांधी ट्विटर रणनीती बदलणार?
• कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मते राहुल गांधींनी अनफॉलो करणे यात धक्कादायक काही नाही.
• राहुल गांधी यांचे ट्विटर खाते रिफ्रेश केले जात आहे.
• ते आधीपासूनच ट्विटरवरील सक्रियतेमुळे चर्चेत असतात.
• भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधीच्या ट्विटर टीकेची दखल घ्यावी लागते.
• आता त्यांना आपल्या ट्विटर रणनीतीत काही बदल करायचे आहेत.
• त्यासाठी त्यांनी अनेकांना अनफॉलो केले आहे, पण आता ते नव्याने फॉलो करतील.
• सध्या त्यांनी ज्यांना अनफॉलो केले आहे, त्यांच्यातील अनेकांचा नव्या यादीत समावेश असू शकेल.