मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बारावी बोर्डाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं.
- बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही-
- विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मोदी म्हणाले.
- विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे.
- विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असंही मोदी म्हणाले.