मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) नवीन अध्यक्ष आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने या नियुक्तीस मान्यता दिली. महेश मित्तल कुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील.
अनुसुचित जाती-जमातींचा सदस्य न केल्याने खर्गेंचा विरोध
समितीमध्ये सदस्य असलेले राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एससी-एसटी समाजातील प्रतिनिधीला मानवाधिकार आयोगाचा सदस्य न केल्याने आक्षेप घेत बैठकीत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद सहा महिन्यांपासून होते रिक्त
- गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी न्यायमूर्ती एचएल दत्तू निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते.
- यामुळे आयोगासाठी पूर्ण काळ अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय पॅनेलची सोमवारी बैठक झाली.
- या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे सहभागी होती.
- माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आणि इतर दोन सदस्यांच्या नावांवर खर्गे यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही.
- पण आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.