मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला अनेपक्षितपणे धावून आलेल्या भाजप नेत्यानंतर आता मनसे नेता आणि एक एअरलाइन्सचा अधिकारीही आले आहेत. मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आपल्यालाही जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
मनसेचे पश्चिम उपनगरातील स्थापनेपासूनचे नेते मनिष धुरी यांनी ‘त्या’ महिलेने म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने आपल्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्याची आठवण सांगितली आहे. तिने नंतर रात्रीअपरात्री मॅसेज करणे, कॉल करणे वगैरे प्रयत्न करून लगटीचाही प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या आरोपानुसार ‘त्या’ महिलेने एकदा त्यांना अंधेरीच्या पूर्व भागातील शेर-ए-पंजाब सोसायटीत नेले. तिथे तोलानी कॉलेजच्या मागे असलेल्या इमारतीतील फ्लॅटमध्ये ती महिला आपल्याला घेऊन गेली. मात्र, तिने सांगितल्याप्रमाणे तिथे तिची बहिण नव्हती. उलट तिने आपल्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर तिथे आणखी कुणी असल्याचा संशय आल्याने आपण तेथून पळ काढला, असे मनिष धुरी यांनी सांगितले.
त्यानंतर आपण पुन्हा या महिलेला दूरच ठेवलं. आज भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धुरी पुढे सरसावले.
मनसेच्या या स्थानिक नेत्याप्रमाणेच जेट एअरलाइन्स या कंपनीचे अधिकारीही ‘त्या’ महिलेविरोधात आरोप केला आहे. तिने मलाही ब्लॅकमेल केले असा त्यांनी म्हटले आहे.
ही बातमीही वाचा:
धनंजय मुंडेंना भाजप नेत्याकडून मोठा दिलासा! ‘ती’ महिला ‘हनीट्रॅप’वाली असल्याचा आरोप!!