Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!

क्रिटी केअरला केंद्राची परवानगी, मनपालाही न मिळणारी को-वॅक्सिन कशी मिळाली?

May 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
the lalit

मुक्तपीठ टीम

 

हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरणाच्या पंचतारांकित पॅकेजविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना कारवाई आदेश दिले. त्यानंतर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हॉटेल ललितवर धडकल्या. धक्कादायक बाब अशी की तिथं क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयानं साध्या फ्रिजमध्ये लसी ठेवण्यासाठी वापरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उलट लस घेतल्याचे समाधान वाटेल पण प्रत्यक्षात पुढे त्याचा वेगळा दुष्परिणाम होईल, अशी भीती महापौरांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी केंद्र खासगी पॅकेजविरोधात कारवाई करण्यासाठी सांगत असताना त्यांनीच मुंबई मनपाला न मिळणारी को-वॅक्सिन लस खासगी रुग्णालयांना मिळते, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला आहे.

 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी हॉटेल ललितची तपासणी केली. तेथे हॉटेलने त्यांच्यातर्फे लसीकरण पॅकेज नसल्याचा दावा केला. मात्र, तेथे क्रिटीकेअर या रुग्णालयाकडून लसीकरण केले जात असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब अशी की पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या लसीकरणासाठी क्रिटीकेअरने साध्या फ्रिजचा वापर केला आहे, असे महापौरांनीच माध्यमांना सांगितले.

 

  • कालपर्यंत ललित हॉटेलमध्ये लसीकरण झाले, हे नक्की आहे.
  • त्यांच्या फाइलनुसार, दिवसाला त्यांनी पाचशेपर्यंत लसीकरण केले आहे.
  • तेथे आम्हाला को-वॅक्सिनच्या चीट सापडल्या आहेत.
  • येथे हा प्रकार असा दिसतोय, क्रिटी केअर रुग्णालयाने केंद्राकडून परवानगी घेतली आणि त्यांना को-वॅक्सिन लस मिळाली.
  • पण मला यांच्या फ्रिजबद्दलही डाऊट आहे. कारण तापमान राखावं लागतं.
  • आपलं तापमान हे नेहमीच्या फ्रीजमध्ये ठेवायचे नाही.
  • कोणत्याही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये. त्यांना नुसतं समाधान की मी लस घेतली आणि नंतर दुष्परिणाम होतील, असे नको.
  • ललित हॉटेलने दोन डॉक्टर घेतलेले आहेत. तेथे असलेल्या ग्राहकाने लस घेतल्यानंतर काही त्रास होत असेल तर त्यांना तपासले जाते.
  • जर आपल्याला मुंबई मनपाला को-वॅक्सिन मिळत नाही. पण जर कॉर्पोरेटला ती लस विकत घेऊ देत असतील, त्यांना केंद्र परवानगी देत असेल. तर मला लोकांना सांगायचे आहे की मुंबई मनपा तर तर लोकांना मोफतच देत आहे. तापमान राखण्यासाठी योग्य ठिकाणी लस ठेवत लसीकरण करत आहोत.
  • ललित हॉटेलचा या लसीकरणाशी संबंध नाही, पण ज्यांनी ही जागा घेतली आणि क्रिटी केअर रुग्णालयाने लसीकरण केले, ते कशाप्रकारे करतात, ते अशा साध्या फ्रिजमध्ये स्टोरेज करत असतील तर हे वेगेळे आहे. त्याची चौकशी केली जाईल.
  • क्रिटीकेअरने कॉर्पोरेट कंपन्यांसाठी येथे लसीकरण केले आहे.

 

कोरोना लसी योग्य तापमानात ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी मुंबई मनपा तसेच इतर सार्वजनिक आरोग्य सेवेतील रुग्णालयंही खास साधनं वापरतात. परंतु पंचतारांकित रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरणासाठी मात्र साध्या फ्रिजचाच वापर केला जात आहे. कोरोना लसी योग्य तापमानाला ठेवल्या नाहीत तर त्या खराब होतात, त्यामुळे तिथं झालेल्या लसीकरणाचा ती घेतलेल्यांना उपयोग होईल का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी क्रिटीकेअर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


Tags: kishori pednekarlalit hotelमहापौर किशोरी पेडणेकरमुंबई मनपाललित हॉटेलहॉस्पिटल्स
Previous Post

हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभर लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!

Next Post

मोदी सरकारची सात वर्षे…काय साधलं, काय बाधलं? टॉप – १० मुद्दे

Next Post
Modi Government 7 years

मोदी सरकारची सात वर्षे...काय साधलं, काय बाधलं? टॉप – १० मुद्दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!