मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या महामारीत सर्वांना जाणवली ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेववरील अतिताण. त्यात पुन्हा जेव्हा कोरोना ग्रामीण भागातही फोफावू लागला तेव्हा तेथील आरोग्य व्यवस्थेतील सुविधांचा अभाव अधिकच खुपला. कोरोना महामारीच्या काळात एक मोठा वर्ग असाही आहे ज्याला वैद्यकीय सल्ला पाहिजे असतो, पण तो मिळवणे ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही काही वेळा अवघड जाते. त्यामुळेच आता दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाने ऑनलाइन वैद्यकीय सल्ला सेवा सुरु केली आहे.
तिसऱ्या लाटेच्या सामना करण्यासाठी आताच तयारी
- कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरण्यापूर्वीच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे.
- त्यामुळे आतापासूनच तातडीने सर्व सोयी-सुविधा केल्या जात आहेत.
- आता देशातील कोणत्याही कोपऱ्यातून तिसर्या कोरोना संसर्ग लाटेविषयी किंवा काळ्या बुरशीच्या संसर्गापासून मुलांचे संरक्षण कसे करता येईल यासाठी दिल्लीतील एम्स आणि सफदरजंगच्या डॉक्टरांचा सल्लाही घेता येणार आहे.
- दिल्ली एम्स आणि सफदरजंगचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देशातील खेड्यात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी एकजुटीने पुढे सरसावले आहेत.
देशभरातील रुग्णांसाठी वैद्यकीय हेल्पलाइन
- त्यांनी एक हेल्पलाइन डेस्क नंबर (७८२७४७६९८३) जारी केला आहे, ज्यामध्ये विनामूल्य सल्ला देण्याची सुविधा प्रदान केली जात आहे.
- कोरोना रूग्ण जिथेही असतील तिथून ते हेल्पलाइन नंबरच्या व्हॉट्सअॅपवर आपला रिपोर्ट किंवा पीडीएफ कॉपी पाठवू शकतात.
- त्यांना त्यांच्या समस्येवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पाठवला जाईल.
- ही हेल्पलाईन सध्या सुरू झाली आहे.
- मधुमेह, पोट आणि हृदयविकार असे आजार असलेल्या कोरोना संसर्गित रुग्णांवर अधिक लक्ष दिले जात आहे. दररोज २० पेक्षा जास्त लोक संपर्क साधत आहेत.
- कोरोना व्यतिरिक्त, कर्करोगाने ग्रस्त असलेले रूग्णही अधिक संपर्क साधत आहेत.
हेल्पलाइनचे काम कसे चालते?
- हेल्पलाइनसाठी समन्वय साधण्याचे काम एम्सचे नर्सिंग अधिकारी कनिष्क यादव करतात.
- त्यांनी एम्स व सफदरजंग येथील डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आणि त्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे.
- त्यांना एखाद्या रुग्णाचा मदतीसाठी मॅसेज मिळाल्यावर ते त्या रूग्णची बाजू पॅनेलसमोर ठेवतात.
- संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मागतात.
- आवश्यकता भासल्यास रुग्णाला संपर्क साधून, विचारपूस करून त्यानंतर तज्ज्ञांचा योग्य सल्ला पाठविला जातो.