मुक्तपीठ टीम
“हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातच असतील, तर मग तुमची गरजच काय?” असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार नेहमीच आपली प्रत्येक जबाबदारी केंद्रावर ढकलायचेच काम करत असते. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
- भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे.
- मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम करते.
- संजय राऊत यांना तर रोज उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही.
‘राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण?’
- महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिलं होतं.
- राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण मिळवणे इतके सोपे आहे का?
त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. - मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल.
यासाठी बराच वेळ जाईल. - मात्र, राज्यातील आघाडी सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
“मराठा आरक्षणासाठी सर्वांनी पंतप्रधान मोदींना भेटणे सर्वात महत्वाचे!”