मुक्तपीठ टीम
भारतातील जुन्या प्रस्थापित टेलीकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्वस्त दरात डेटा पुरवून बाजार काबीज करणाऱ्या जियो आता गुगलसोबत आता स्वस्त स्मार्ट फोन तयार करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगल स्वस्त स्मार्टफोन तयार करण्यासाठी जियोसोबत काम करत आहे.
स्वस्त स्मार्ट फोनची योजना
• स्वस्त स्मार्टफोनच्या या प्रकल्पावर काम सुरू आहे.
• गेल्या वर्षी गुगलने ३३ हजार ७३७ कोटी रुपयांमध्ये जिओत ७.७ टक्के हिस्सा विकत घेतला होता.
• त्यावेळी दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरीत्या एन्ट्री-लेव्हलचे स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा व्यावसायिक करारही केला आहे.
• गुगल-जियो स्वस्त आणि परवडणारे फोन बनवण्यावर भर देत आहेत.
त्यांनी स्मार्टफोन लॉन्च करण्याची तारीख आणि किंमतीची अजून कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. स्वस्त डेटा दरासह परवडणार्या उपकरणांची उपलब्धता देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचविण्यात मदत करू शकते.
जियो प्लॅटफॉर्ममध्ये गुगलची गुंतवणूक ‘गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंड’ ची भागीदारी आहे. ती गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये देशातील इंटरनेट सेवा वेगवान होण्यासाठी पिचई यांनी येत्या पाच ते सात वर्षांत भारतात ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
१० अब्ज डॉलर्सच्या फंडाची गुंतवणूक
गुगल आपल्या १० अब्ज डॉलर्सच्या इंडिया डिजिटलायझेशन फंडासह नवीन संधी शोधण्याच्या प्रयत्नात आहे. या वर्षाच्या शेवटी आणखी काही घोषणाही होण्याची शक्यता आहे. गुगलच्या नियोजित प्रकल्पांवर कोरोनाच्या दुष्परिणामांविषयी बोलताना पिचाई म्हणाले की, “साथीच्या आजाराने लोकांनी जीवनातील तंत्रज्ञानाचे महत्त्व कळले आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व आम्हाला चांगले ठाऊक आहे. गुगलची उत्पादने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर चांगले कार्य करते. स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत लोकांना उपलब्ध होण्यासाठीही गुगल काम करत आहे. कंपनीने नवीन प्रायव्हसी सेटिंग्ज, एआय टूल्स आणि अँड्रॉइड १२ चा पहिला बीटा रिलीज करण्यासह अनेक नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली, जी या वर्षापर्यंत त्यांच्या गुगल सेवांचा भाग होतील.
एआयच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करू नये
१. एआयच्या फायद्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये.
२. कारण तंत्रज्ञानाने लोकांना रोजच्या जीवनात नेहमीच नवीन नवकल्पना दिल्या आहेत आणि त्यांचे कार्य सोपे केले आहे.