मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप केलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आलं आहे. तसेच इथेनॉल निर्मितीतही महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. याचं श्रेय कोरोना संकटातही मेहनतीत खंड पडून देता ऊसाचं चांगलं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिलं जात आहे.
१८९ साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम
- राज्यात यावर्षी २०२०-२१ च्या हंगामात एकूण सहकारी आणि खासगी अशा मिळून एकूण १८९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.
- महाराष्ट्राची गाळप क्षमता ७६ हजार टनानं वाढली आहे.
- यावर्षीच्या हंगामात एक हजार १२ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्यात आलं.
- १४० दिवसांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे.
- पावसाळा येण्यापूर्वीच राज्यातील सर्व ऊसाचं गाळप झालं आहे.
इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!
- साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याची माहिती दिली आहे.
- गेल्या पाच वर्षात इथोनॉलच उत्पन्न झालं नाही ते यावर्षी झालं आहे, असंही ते म्हणाले.
सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात
- यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले आहे. साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे.
- पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे.
- सर्वात कमी उतारा नागपूर विभागात राहिला आहे.
कोरोनाच्या संकटातही विक्रमी गाळप
- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ चा गाळप हंगाम सुरु झाला.
- राज्यातील शेतकऱ्यांची मेहनत, साखर कारखान्यांची यंत्रणा याद्वारे राज्यामध्ये कोरोनाचं संकट असतानाही विक्रमी गाळप झालं आहे.
- यानिमित्तानं महाराष्ट्र हे साखर उत्पादनातील अग्रेसर राज्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
या विक्रमी गाळपाची आकडेवारी
- कोल्हापूर-२३१.०९ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन २७७.३८ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा १२ टक्के
- पुणे- २३०.९३ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन २५३.२६ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के
- सोलापूर- १७५.८६ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन १६४ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के
- अहमदनगर – १६९.६४ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन १६६.५८ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के
- औरंगाबाद – १००.०३ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ९६.९० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के
- नांदेड – ९४.२८ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ९४ लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के
- अमरावती – ५.८२ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ५.२० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ८.९३ टक्के
- नागपूर – ४.३५ मेट्रिक टन गाळप, साखरेचं उत्पादन ३.९० लाख क्विंटल तर सरासरी साखर उतारा ८.९७ टक्के