मुक्तपीठ टीम
योगगुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे. बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींकडेही तक्रार करण्यात आली आहे. आयएमएने पंतप्रधान मोदींकडे रामदेव बाबांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आयएमएने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, “पतंजलीचे मालक रामदेव बाबाकडून लसीकरणासंबंधित चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, हे रोखले पाहिजे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असूनही १०,००० डॉक्टर आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा. ”
अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी बाबा रामदेव यांनी १५ दिवसात माफी मागितली नाही तर १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा आता आयएमएने रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. आयएमए (उत्तराखंड) चे सचिव अजय खन्ना यांनी दिलेल्या ६ पानी नोटिसात त्यांचे वकील नीरज पांडे यांनी रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अॅलोपॅथी आणि असोसिएशनशी संबंधित सुमारे २००० डॉक्टरांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन केल्याचे म्हटले आहे.
भारतीय दंड संहिता कलम ४९९ अन्वये योगगुरूची टिप्पणी ‘गुन्हेगारी कारवाई’ असल्याचे वर्णन करताना रामदेव बाबांकडे नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसांच्या आत ‘लेखी माफी’ मागितली आहे आणि असे म्हटले आहे की जर तसे झाले नाही तर १००० कोटी रुपये नुकसान भरपाई द्या. या नोटीसमध्ये रामदेव बाबांना सांगितले की त्यांच्यावरील केलेल्या सर्व खोटे आणि निंदनीय आरोपांचे खंडन करून व्हिडिओ क्लिप बनवण्यास सांगितले आहे आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सांगितले आहे.