मुक्तपीठ टीम
सव्वा लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप झालेल्या औरंगाबादमधील ममता रुग्णालयावर कारवाई झाली आहे. तक्रारीनंतर अवघ्या १८ तासांत रुग्णालयाची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे. बजाजनगर परिसरातील ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द झाल्याने त्यांना आता नव्या रुग्णांना दाखल करता येणार नाही.
रुग्ण न्याय हक्क परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ममता रुग्णालयाच्या विरोधात रुग्ण न्याय हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.
- कोरोना केअर सेंटर चालू करताना आवश्यक परवानग्या नसतानाही बेकायदेशिरपणे रुग्णालय सुरु होते.
- गोरगरिबांची लाखो रुपयांची लूट रुग्णालय प्रशासन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
रुग्णाचा मृतदेह रोखणे पडले महाग
- सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता.
- त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तक्रारीची चौकशी करण्यासाठी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॅॉ. विजयकुमार वाघ, डॉ. प्रशांत दाते, डॉ. बामणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.
- या चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर केला.
- अहवालाची तात्काळ दखल घेत अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द केली.
सुनील चव्हाणांनी दिले आदेश
सध्या कोरोनाची दुसरी लाट असल्याने आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज द्यावा, लागणार आहे. तसेच २५ मे नंतर रुग्णालयामध्ये कोणत्याही नवीन कोरोना रुग्णास आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात येणार नाही