मुक्तपीठ टीम
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आज भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.
जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्त पालघर वासियांना भाजपाच्या आमदार मनिषाताई चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे, त्यावर दरेकर म्हणाले. विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही संकट काळात कोकणवासीयांना मदत करत आमची जबाबदारी पार पाडत आहोत. राज्यात अनेक संकट आले असून मुंबई शहराने अनेक संकट झेलली असून याच संकटातून मुंबई उभी राहिली आहे, आणि इतरांना उभं करण्याच काम केलं आहे, ही आपली संस्कृति, परंपरा असल्यामुळे परत एकदा आपण सर्वांनी मिळून काम करूया, मदतीचा विश्वास लोकांना देऊया असे, विधान दरेकर यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.
दरेकर म्हणाले, संकट काळात आज भाजपे चे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत आहे, कधीकाळी शिवसेना गोरगरिबांसाठी लढत असून मदतीचा हात शिवसेना शाखा प्रमुख अध्यक्ष, नगरसेवक यांच्याहस्ते मदत करताना दिसून यायची परंतु आज शिवसेनेची ती सामाजिक बांधिलकी दिसून येत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्र्यांचा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहित ७०० किलोमीटर असा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ३ दिवसीय दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेत, मच्छीमारांशी, बंगायतदारांशी संवाद साधला त्यांच दुख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाही, यावरून सरकारचं जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहे हे दिसून येत आहे. तसेच वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे, वादळ हे ४ तास थांबले होते परंतु मुख्यमंत्री केवळ ३ तास सुद्धा थांबू शकले नाही. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका दरेकर यांनी केली असून ते म्हणाले,
जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का
पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवास करतात म्हणून आणि आम्ही जमिनीवरून दौरा करतो अशी टीका मुख्यमंत्री करत असताना ते विसरत आहे का, की ते खासगी विमान घेऊन रत्नागिरी येथे गेले असून विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिस येथे जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्याना विमानतळावर बोलावून बैठक घेतली, बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले अधिकाऱ्याना बोलवले आणि हेलिकॉप्टर ने परत मुंबईला आले त्यामुळे स्वतः विमानाने जाऊन पंतप्रधानांना हावाई दौरा करतात अशी टीका करताना मुख्यमंत्री जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का? असा खोचक सवाल दरेकर यांनी केला.
जनतेच्या डोळ्यात धूळफेक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोटोस साठी कोकण दौरा करतात असा आरोप करत असताना तुम्ही येथे येऊन एक फोटोस साठी तीन दिवस शासनाची यंत्रणा कामाला का लावली? मुख्यमंत्री कोकणात येणार म्हणून तीन चार दिवस सर्व अधिकारी कोकणातले कामावर होते, तुम्ही जर आला नसता तर त्या ३-४ दिवसांत अधिकाऱ्यानी कोकणवासीयांना काहीतरी दिलासा दिला असता. तसेच पंचनामे झाल्यावर मदत करू, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले असता तुम्ही गेला तेव्हा पंचनामे झाले नव्हते का? असा सवाल करत दरेकर म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस गेलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच जेव्हा आपत्ति येते तेव्हा तात्काळ मदत करायची असते परंतु दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री करू शकले नाही. केवळ दीखाऊनपणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक राज्यसरकार करत असल्याची टीका दरेकर यांनी केली.
भाजप मदत करण्यास सक्षम
कोकणमध्ये नितेश राणे यांच्या मार्फत २ ट्रक पत्रे आणि कवलं कोकणवासीयांना देण्यात आली. अजूनही सामान भाजप नुकसानग्रस्त लोकांसाठी पाठवत आहे, शेवटी हा आधार संकट काळात राज्यसरकारकडून मिळणं आवश्यक आहे परंतु तोच आधार, मदत भाजप देत आहे. भाजपमध्ये सर्व आमदार, कार्यकर्त्यांना माणुसकी, सामाजिक बांधिलकी आहे याचा मला अभिमान आहे,
राज्यात एका ठिकाणी ४६ प्रेत जाळली गेली हे पाप कोणाचे?
गंगेमध्ये प्रेतांचा खच पडत आहे हे पाप कोणाचं अशा प्रकारची टीका रोखठोक मधून आज झाली त्यावर मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे, राज्यात एका ठिकाणी ४६ प्रेत जाळली गेली हे पाप कोणाचे? राज्यात झालेला मृतदेह आकडा आपण दाखवला नाही ते मृतदेह कुठे गेले, ते पाप कोणाचे? एक अॅम्ब्युलन्स मध्ये २३ प्रेत नेहतात, प्राशसनाचे भोंबळ कारभार दिसून येत आहे हे पाप कोणाच, म्हणजे राज्यसरकारने आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांच बघायचं वाकून अशा प्रकारची प्रवृत्ती राज्यात होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.