मुक्तपीठ टीम
ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते देशातील नेते कोरोना संकटात सामान्यांच्या मदतीत कमी पडत असल्याची टीका होत आहे. तर त्याचवेळी बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू गरजूंच्या मदतीसाठी सरसावत आहेत. एक उदाहरण प्रियांका चोप्राचं आहे. काही दिवसांपूर्वी लस टंचाईमुळे लसीकरणासाठी भारतीयांचे होणारे हाल पाहून तिनं थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना साकडं घातलं होतं. अमेरिकेने ठेवलेला लसींचा साठा गरजेपेक्षा खूपच जास्त आहे. तुम्ही भारताला तात्काळ लस देऊ शकता का? असं आर्जव तिनं केलं होतं. आताही या देशी गर्लनं भारतासाठी पतीसोबत आवाहन करुन जमवलेल्या २२ कोटींच्या निधीचा गरजूंच्या मदतीसाठी कसा वापर करणार ते मांडलेलं आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनसने भारतीयांसाठी २२ कोटींचा निधी जमवला आहे. याची माहिती प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरुन दिली आहे. कोरोनाचा सामना करत असलेल्या भारतीयांसाठी प्रियांका आणि निकने गिव इंडिया (Give India) सोबत एकत्र येत हा निधी जमावला आहे.
View this post on Instagram
प्रियांकाने व्हिडिओ केला शेअर
• गिव इंडियाचे सीईओ अतुल सतीजा यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती प्रियांका चोप्राने सोशल मीडियावरुन दिली आहे.
• तिने या व्हिडीओत म्हटलंय की, जमा केलेल्या निधीचा वापर हा भारतातला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि लसीकरणाच्या मोहिमेसाठी केला जाणार आहे.
• प्रियंकाने याआधीही भारतासाठी प्रयत्न केले आहेत. तिने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे भारताला लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. माझ्या देशाची स्थिती गंभीर आहे. मेरा दिल टूट गया है.
• अमेरिका ५५० मिलियनहून अधिक लसींची आयात करणार आहे. हा साठा फार मोठा आहे.
• अॅस्ट्राझेनेकाला जगभरात वितरीत करण्यासाठी POTUS, HCOS, सेक ब्लिंकेन आणि जेक सुलिवन यांचे आभार.
• मात्र माझ्या देशाची परिस्थिती फार गंभीर आहे. तुम्ही भारताला तत्काळ लसी देऊ शकता का? #vaxlive