मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधावर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे काही राजकीय आणि सामाजिक संस्था आणि नेते रुग्णसेवेसाठी पुढे सरसावले आहेत. (इथून use vis – महिला बाहेर येत आहेत, टाळ्यांचा आवाज – येथे व्हीओ नको) कोरोनानं ग्रासल्यानंतर या महिलांनी धाव घेतलेल्या पंढरपुरातील पर्ल्स रुग्णालय आणि कोरोना सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले.
उपचारानंतर त्या बऱ्या होऊन परतल्या. जीवावरील संकटातून बाहेर येऊन घरी जाणारी ही माणसं आता रोजची झाली आहेत. त्यांना पाहिलं की कोरोना संकटात तातडीने हे रुग्णालय सुरु करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेशकाका भोसले यांचा कामाचं महत्व पटतं.
कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार होत नसल्याने त्यांनी हे १५० बेडचे रुग्णालय सुरु केले आहे. तेथे ५० ऑक्सिजन बेड आहेत. २४ तासात ४० सिलिंडर लागत असल्याने ऑक्सिजन प्लांटची उभारणीही सुरु आहे.
पाहा व्हिडीओ: