मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. बेड्स, ऑक्सिजन तुटवड्यासह काही विशिष्ट इंजेक्शनसाठीही नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. आधी रेमडेसिवीर, आता म्युकर मायकॉसिसवरील इंजेक्शन बाजारात सहज उपलबध होत नसताना डॉक्टरांकडून हेच औषध लिहून दिलं जात आहे. यावरून अभिनेता सोनू सुदने डॉक्टरांना प्रश्न विचारला आहे.
सोनूने ट्विट करत पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे – “एक साधा प्रश्न. जेव्हा प्रत्येकाला माहित आहे, की विशिष्ट इंजेक्शन बाजारात उपलब्धच नाही, मग प्रत्येक डॉक्टर फक्त त्या इंजेक्शन्सची मागणी का करीत आहे. जेव्हा रुग्णालयाला ते इंजेक्शन मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना कसे मिळेल? त्या इंजेक्शनला पर्यायी औषध का उपलब्ध होत नाही, ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील?”
One simple question:
When everyone knows a particular injection is not available anywhere,why does every doctor recommends that injection only?
When the hospitals cannot get that medicine then how will a common man get?
Why can’t v use a substitute of that medicine &save a life?— sonu sood (@SonuSood) May 18, 2021
सोनूला मिळाले उत्तरही!
काही यूजर्सनी सोनूने डॉक्टरांना विचारलेल्या प्रशांना उत्तरही दिले आहे, “काही औषधांना पर्याय नसतो. जर आपण लिपोसोमल अम्फोटेरिसिन बीबद्दल चर्चा करत असाल तर अद्याप कोणताही ज्ञात पर्याय नाही. औषधे उपलब्ध होण्याची यंत्रणेची जबाबदारी आहे, डॉक्टरांची नाही”.