मुक्तपीठ टीम
अनेक महिन्यांपासून आपल्या पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लोकप्रिय इन्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नव-नवीन फीचर्स आणत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन फीचर्सना रोल आउट करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. काही नवीन फीचर्ससुद्धा आणत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कंपनीने नुकतेच आपल्या युजर्ससाठी ‘स्प्लॅश स्क्रीन फीचर’ हे नवीन फीचर्स रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.
या यूजर्ससाठी हे फीचर
- लाईट आणि डार्क स्प्लॅश स्क्रीन फीचर एक वर्षापूर्वी अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्सना देण्यात आले होते.
- आता हे फीचर व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप यूजर्ससाठीही देण्यास सुरुवात केली आहे.
- हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनच्या २.२११९.६ या अपडेटच्या रुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपचे नवीन स्टिकर पॅक
- याशिवाय व्हॉट्सअॅपने एक नवीन स्टिकर पॅक देखील सादर केले आहे.
- या नवीन स्टिकर पॅकला ‘शेअर आशियन लव्ह’ असे म्हटले गेले आहे.
- हा स्टिकर पॅक १.८ एमबीचा आहे.
- हा पॅक कंपनीच्या अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.