मुक्तपीठ टीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेत औषधनिर्माता (फार्मासिस्ट) या पदासाठी ९६ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ८९ जागा अशा एकूण १८५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) बी.फार्म/ डी.फार्म २) मराठी विषयासह १०वी उत्तीर्ण ३) एमएससीआयटी किंवा सीसीसी २) पद क्र.२- १) बी.एससी+ डीएमएलटी किंवा १२वी उत्तीर्ण+ निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील पदवी २) मराठी विषयासह १२वी उत्तीर्ण ३) एमएससीआयटी किंवा सीसीसी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई- ४०००१२
अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous वरून माहिती मिळवू शकता.