Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संदीप खरेंच्या काव्यकथा स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये खास मुलांसाठी!

May 19, 2021
in प्रेस रिलिज
0
sandeep khare

मुक्तपीठ टीम

 

स्टोरीटेलवर सध्या छोट्या बालदोस्तांसाठी उन्हाळी सुट्टीनिमित्त एकापेक्षा एक धम्माल ऑडिओबुक्स रिलीज होत आहेत. गेल्या आठवड्यात भा. रा. भागवत यांची मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कथा ‘फास्टर फेणे’चे अभिनेता अमेय वाघ याच्या आवाजातील ऑडिओबुक प्रकाशित झाली आहे. आता लगेचच लहान मुलांसाठी कवितेत गुंफलेल्या सुंदर काव्यकथा प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप खरे यांच्या आवाजात बालदोस्तांसाठी स्टोरीटेल घेऊन येत आहे. यामध्ये प्राणी, राजा, राजकन्या, मस्तीखोर मुलं, परी, अशी अनेक छान छान कॅरेक्टर मुलांना भेटायला येतील.

 

‘अग्गोबाई‌‍‌ऽऽ ढग्गोबाईऽऽऽ’, ‘डिबाडी डिपांग’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘आयुष्यावर बोलू काही’ या गीतसंग्रहासोबत संगीतकार सलील कुलकर्णींबरोबर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करणारे लोकप्रिय कवी, गायक व अभिनेते संदीप खरे यांच्या धम्माल काव्यकथा असलेल्या पाच ऑडिओबुक्स यांच्या गोड आवाजात खास बालदोस्तांसाठी स्टोरीटेलने प्रकाशित केला आहे. छोट्या मुलांना कवितांमधुन रंजकपणे परिकथा, गोष्टी सांगण्याची पध्दत पाश्चात्य साहित्यात मोठ्या प्रमाणावर आहे. मराठीत मुलांसाठी जाणीवपूर्वक काव्यकथा लिहिण्याचा हा प्रयोग स्टोरीटेलच्या निमित्ताने संदीप खरे पहिल्यांदाच करत आहेत.

 

यामध्ये ‘साखरराणी हुशार राजपुत्राने काय युक्ती केली! तुसड्या राजकन्येची साखरराणी झाली’, ‘चंदा आणि परी ! परीच्या जादूने किमया घडली ! गरीब, मेहनती चंदा , राणी बनली’, ‘ओटो सानला धडा छान खोडकर ओटोचा भरला घडा ! तेंदूच्या कोटाने शिकवला धडा’, ‘चँग चू … चुंग चू दोन भावांची गोष्ट आहे हटके! एकाला बक्षीस … एकाला फटके’, ‘दुष्ट लांडगा…. हुशार ससा छोट्याश्या सश्याच्या मदतीला घोडा! पहा कसा शिकवला लांडग्याला धडा!!’ ह्या अप्रतिम आणि सुंदर काव्यकथा प्रसिद्ध कवी संदीप खरेंच्या गोड आवाजात ऐकताना मुले सहज रमून जातात. या सर्व काव्यकथांचे शब्द आणि अभिवाचन संदीप खरे यांनी केले असून त्यावर संगीतसाज निनाद सोलापूरकर यांनी चढवला आहे.

 

खास मुलांसाठीच्या आवडीच्या कथा काव्य असलेल्या या ऑडिओबुक्स मुलांना सहज आणि सोप्या पद्धतीने गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप सहज डाऊनलोड करून किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड सहज ऐकता येतील.

 


Tags: sandeep khareऑडिओबुक्सकवीगायक व अभिनेते संदीप खरे
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

प्रधानमंत्री आवास योजना: खरंच आहोत का आपण लाभार्थी? असं तपासा…

Next Post
PMAY

प्रधानमंत्री आवास योजना: खरंच आहोत का आपण लाभार्थी? असं तपासा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!