मुक्तपीठ टीम
लेनोव्होने आपला नवीन ब्रँड लेनोव्हो गो बाजारात आणला आहे. नवीन गॅजेट तयार करण्यासाठी कंपनीने नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. या नवीन गॅजेटमुळे ऑफिसमधून काम करणे आणि घरून काम करणे यामधील अंतर संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी कंपनीने लेनोव्हो गो यूएसबी-सी लॅपटॉप पॉवर बँक आणि लेनोव्हो गो वायरलेस मल्टी-डिव्हाइस माऊस बाजारात आणला आहे. लेनोव्होने म्हटले आहे की, ते लवकरच आणखी उपकरणे बाजारात आणतील.
लेनोवोच्या ग्लोबल एसएमबी, व्हिज्युअल अँड अॅक्सेसरीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लेनोव्होच्या सर्वेक्षणात २०% छोट्या व्यवसायातील कर्मचार्यांकडे रिमोट मोडवर सहजपणे ऑपरेट करण्यासाठी तंत्रज्ञानाची साधने नसतात. आजच्या रिमोट आणि हायब्रिड वर्क कल्चरमध्ये डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसी असणारे तंत्रज्ञान असणे फार महत्वाचे आहे, जे कर्मचार्यांची उत्पादकता सुधारेल”.
छोट्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची मोठी गरज ओळखून लेनोव्हो गो ते मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे कळते. लेनोव्हो हे दोन्ही डिव्हाइस या वर्षी जूनमध्ये लॉन्च करू शकतो. कंपनीच्या या विशेष पॉवर बँकेची किंमत ६,५८९ रुपये आहे. तर माऊसची किंमत ४,३९२ रुपये आहे.
‘लनोव्हो गो’ची पॉवर बँक आणि चार्जर