मुक्तपीठ टीम
कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील सर्वात प्रभावी रामबाण औषध असल्याचे सांगितले जात असलेले डीआरडीओचे 2 डीजी औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भुकटी स्वरुपात असणारे हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी ढासळण्यालाही प्रतिबंध होतो.
या औषधाचे वर्णन कोरोनाविरूद्धच्या लढ्यात गेम चेंजर म्हणून केले जात आहे. पुढील आठवड्यापासून २ जी औषध बाजारात उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात ते दहा हजार डोससह लाँच केले जाणार आहे. हे औषध कोरोनामुळे रूग्णांमध्ये संक्रमण होण्यापासून प्रतिबंधित होते आणि ऑक्सिजनची कमतरता देखील येऊ देत नाही.
डीआरडीओचे कोरोनाविरोधातील रामबाण औषध
• डीआरडीओच्या लॅबने हैदराबादची खासगी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून ही औषध निर्मिती केली आहे. वैद्यकीय चाचणीदरम्यान, 2-डीजी औषधाचे 5.85 ग्रॅमच्या पुड्या तयार केल्या गेल्या.
• यातली पुडीतील औषध भुकटी ही सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून रुग्णांना दिली गेली.
• याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे.
• ज्या रुग्णांना हे औषध दिलं गेलं त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली आहे.
• याच आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला आपत्कालीन परिस्थितीत वापराला मंजुरी दिली आहे.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाचा डोस घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
• सध्या ते रुग्णालयांमध्येच उपलब्ध असेल.