मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहांन मुलांना बसत आहे. यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.
कोवॅक्सिनची मुलांसाठी चाचणीची शिफारस का?
- भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन ही लस कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी ठरत आहे.
- ही लस ८१ प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला गेला आहे.
- ही चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसंच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी केली जाईल.
यापूर्वी भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनला मंजूरी देण्याची विनंती केली होती. यावर मंगळवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) कोरोना विषयक समितीने बैठक घेऊन विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केल्याचं समजतं.
भारत बायोटेककडून या राज्यांना लसीचा पुरवठा
- आंध्र प्रदेश
- आसम
- छत्तीसगड
- दिल्ली
- गुजरात
- जम्मू आणि काश्मीर
- झारखंड
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- ओडिसा
- तामिळनाडू
- तेलंगणा
- उत्तर प्रदेश
- पश्चिम बंगाल
- बिहार
- हरियाणा
- कर्नाटक
- त्रिपुरा
COVAXIN® has been directly supplied to 18 states since May 1st.
Unflinching in our efforts, we will continue the steady supply of our #vaccine.Get yourself and your loved ones vaccinated.#BharatBiotech #COVAXIN #COVID19Vaccine #COVID19 pic.twitter.com/B3mlFT6KoT
— BharatBiotech (@BharatBiotech) May 11, 2021