मुक्तपीठ टीम
ही एक आपल्या कामातून कर्तव्य पार पाडणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या या बातमीचे दोन रूप आहेत. एकीकडे, जिथे जन्मदात्या आई-मुलाचा पवित्र संबंध तर, दुसरीकडे, कर्तव्य दृढपणे पूर्ण करण्याचा निर्धार. विचार येत असेल की ही नक्की कसली भानगड आहे. तर ही भानगड आहे ती अहमदनगर महानगरपालिकेत काम करणाऱ्या राशीद शेख नावाच्या कर्मचाऱ्याची. त्याने त्याच्याच आईच्या भाजीच्या गाड्यावर दंड ठोठावला आहे त्याचबरोबर तो भाजी गाडा ताब्यातही घेतला आहे. शेख यांच्या या कर्तव्याची आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
राशिद शेख यांची आई बेगम रफिक शेख यांनी अहमदनगरच्या पाथर्डी तहसीलमध्ये गाडा लावला होता. कोरोनाच्या निर्बंध नियमांनुसार सकाळी ९ ते ११ या वेळेत हे काम केले पाहिजे. पण राशिद यांची आई दुपारी बारा वाजेपर्यंत भाज्या विकत होती. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जेव्हा पालिकेची गाडी बाहेर आली. तेव्हा मनपाच्या कर्मचार्यांनी राशिदच्या आईच्या भाजीचा गाडा पाहिला.
महापालिकेचे कर्मचारी राशिदच्या आईला समजवून दंड वसून केल्याशिवाय सोडणार होते. परंतु, राशिद म्हणाले की, नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. जर इतरांवर कारवाई केली जात असेल तर त्यांच्या आईच्या भाजीच्या गाड्यावरही ही कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई करत स्वत: राशिद यांनी स्वत:च्या आईचा भाजीचा गाडाही जप्त केला आणि दंडही ठोठावला.
पाहा व्हिडीओ: