मुक्तपीठ टीम
अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिनही शेती कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सुप्रीम कोर्टाने आज कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून केंद्र सरकारने अडेलतट्टू भूमिका सोडून तीनही कायदे रद्द करुन नव्याने कायदा करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा – @nawabmalikncp pic.twitter.com/HtapfPG6Oi
— NCP (@NCPspeaks) January 12, 2021
सर्वोच्च न्यायालयाने तिनही शेती कायद्यांना स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. अजूनही वेळ गेली नाही. सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे. तिनही कायदे मागे घेऊन नव्याने कायदा करण्यासाठी प्रस्ताव तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ :