मुक्तपीठ टीम
इंस्टंट मेसेजिंगअॅप व्हॉट्सअॅपवर नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे जगभरातून टीका केली जात आहे. या टीकांना रोख लावण्यासाठी व्हॉट्सअॅपने नव्या पॉलिसीसंबंधित स्पष्टीकरण दिले आहे. यात मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने दिले आहे. हे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने ट्विट करून दिले आहे.
We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption. pic.twitter.com/6qDnzQ98MP
— WhatsApp (@WhatsApp) January 12, 2021
‘तुमचे खाजगी मेसेज आधीप्रमाणेच १०० टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाला तरी गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने याआधी केला होता.
स्पष्टीकरणात काय?
– व्हॉट्सअॅप तुमचे खाजगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही. तसेच तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.
– युजर्सने शेअर केलेली लोकेशन व्हॉट्सअॅप बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
– युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्ट व्हॉट्सअॅप फेसबुकसोबत शेअर करत नाही.
– तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.