Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप कोणाचेही अकाऊंट डिलीट करणार नाही

May 9, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
app

मुक्तपीठ टीम

सोशल मेसेंजर प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने भारतात १५ मेपासून लागू करण्यात आलेली नवीन प्रायव्हसी पॉलिसी आता पुढे ढकलली आहे. कंपनीने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी नवीन तारखांची घोषणा केली नाही. कंपनीने म्हटले आहे की, ज्यांनी ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही त्यांचे कोणचेही अकाउंट डिलीट केले जाणार नाही.

 

 

व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी काय आहे?

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते जे कन्टेंट अपलोड, सबमिट, स्टोर, पाठवतात किंवा प्राप्त करतात, कंपनी त्याचा वापर कुठेही वापरु शकते. कंपनी हा डेटा शेअरही करू शकते. यापूर्वी असा दावा केला जात होता की, वापरकर्त्याने ही प्रायव्हसी पॉलिसी मान्य केली नाही तर ते आपले अकाउंट डिलीट करतील. तसेच, नंतर कंपनीने हे पर्यायी म्हणून वर्णन केले. व्हॉट्सअॅपने निवेदनात म्हटले आहे की, नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी वापरकर्त्यांना रिमाइंडर पाठवत राहतील. ही प्रक्रिया पुढील काही आठवडे सुरू राहील. यापूर्वी ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी ८ फेब्रुवारीपासून अंमलात येणार होती. पण वाद वाढल्यानंतर त्याची १५ मे ही तारीख ठरवण्यात आली होती.

 

 

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत केंद्र सरकारने आक्षेप व्यक्त केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना एक पत्र लिहून असे म्हटले आहे की, “जागतिक स्तरावर व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वात मोठा वापरकर्ता आधार आहे. तसेच व्हॉट्स अॅप सेवांसाठी भारत सर्वात मोठा बाजार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटी आणि प्रायव्हसी पॉलिसी प्रस्तावित केलेल्या बदलामुळे भारतीय नागरिकांच्या निवडी आणि स्वायत्ततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. मंत्रालयाने पॉलिसीमध्ये केलेले बदल मागे घेण्यास सांगितले आहे.”

 

 

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारसमवेत फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर प्रतिक्रिया मागितली आहे. फेसबुक ही व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी आहे. सरन्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाची सुनावणी आहे. कोर्टाने त्यांना या याचिकेवर आपला खटला १३ मेपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.

 

 

संसदीय समितीनेही नवीन प्रायव्हसी पॉलिसीसाठी यावर्षी जानेवारीत फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. फेसबुकच्या अधिकऱ्यांनी संसदीय समितीला आश्वासन दिले, की त्यांच्या सहाय्यक व्हॉट्सअ‍ॅपचा वैयक्तिक डेटा शेअर केला जाणार नाही. यात व्यक्तींमधील संभाषणे आणि संदेशांचा समावेश आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांमधील संदेशांची देवाणघेवाण पूर्णपणे एनक्रिप्टेड असल्याचे सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे.


Tags: प्रायव्हसी पॉलिसीव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी
Previous Post

कंगना थांबेना…इंस्टाग्रामनं डिलीट केली कंगनाची पोस्ट!

Next Post

ठाकरेंसाठी फडणवीस…यूपीत योगींसाठी मोदी सरकारमधील मंत्रीच विरोधात!

Next Post
yogi adityanth

ठाकरेंसाठी फडणवीस...यूपीत योगींसाठी मोदी सरकारमधील मंत्रीच विरोधात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!