तन्वी भोसले
कोरोना संकट एक नैसर्गिक आपत्ती. कोरोना विषाणूमुळे ओढवलेली. त्यातील अनेक कारणांवर चर्चा होत असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोरोनाचा खूपच अभ्यास केला जात आहे. मांडला जात आहे. त्या जोडीलाच एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा हा एक प्रयत्न. मनुष्य प्राण्यांच्याही चुका दाखवतानाच चुका सुधारण्याची संधी दाखवून देणारा.
2020..21 मार्च…सुरुवात झाली आपल्याला…सर्वच माणसांना स्वतःला दुरुस्त करण्याच्या संधीची. कुणी दोष दिला एखाद्या राष्ट्राला, काही सरकारना, काही नेत्यांना. पण खरे दोषी आपणच आहोत, याकडे मात्र कुणाचे लक्षच गेले नाही. किंवा दिले नाही. कोरोना अचानक नाही आलेला. आपण मनुष्यानेच पृथ्वीला दिलेल्या कष्टाने, प्राण्यांना दिलेल्या त्रासाने या निसर्गाचे तळतळाटच लागलेत मनुष्याला. बहुधा म्हणून कोरोना प्राण्यांना, निसर्गाला काही त्रास देत नाही. फक्त माणूसच भरडला जातोय. कारण आपण मनुष्य पृथ्वी वर जे अन्याय करत आलो आहोत, निव्वळ त्यामुळेच हे भोग ओढवले आहेत. आणि सुक्यासोबत ओलंही जळतं तसे चांगल्या वर्तणुकीचे मनुष्यदेखील त्रास भोगत आहेत.
अवास्तव वृक्षतोडीने अधिक उष्मा येऊन पृथ्वीचा ताप वाढला. पुराचे प्रमाण वाढले. भूकंप वाढले.. आणि हे कमी वाटले म्हणून मनुष्याने स्वतःच्या नकारात्मक विचारांनी पृथ्वीचा मॅग्नेटिक फिल्ड पार कोलमडून टाकले आहे. आपले नकारात्मक विचार पृथ्वी घेत आहे. त्याच्या परिणामी भूकंप, त्सुनामी इत्यादी येत आहेत. पृथ्वीची साधन संपत्ती इंधन अतिरिक्त प्रमाणात काढली गेली, हे लक्षात न घेता की ती पृथ्वीसाठी आवश्यक व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स ,कॅल्शियम इत्यादी आहेत. माणूस नेहमी हाच गैरसमज बाळगत राहतो की जगण्याचा अधिकार फक्त मला आहे बाकी इतर सगळे निर्जीव आहेत.
मांसाहार हा तर आता गरज कमी आणि फॅशन अधिक झाला आहे. सोबत पचनतंत्र बिघडवायला रंगीत पाणी आणि धुराडे आहेतच. अति प्रमाणात प्राण्यांची कत्तल केली जाते. ज्या जीवांना जगायचं असत त्यांना बळजबरीने मारलं जात. मग ते जीव पुन्हा आपल्याच शरीरातून जन्माला येतता. काही वेळा कॅन्सरसारखे आजार बनून. आपल्या विचारांचा विस्तार एका मर्यादेपलीकडे जाताच नाही आहे. त्यामुळेच सगळे निसर्ग नियम सोडून आपण मनुष्यच फक्त मुर्खपणाने वागू लागलो आहे. त्याच परिणामी हा कोरोना आला आहे आपल्याला जगणे शिकवायला. स्वार्थ सोडायला लावायला. आणि परमेश्वरासमोर शरण न्यायला.
केव्हाही उठा. केव्हाही जेवण करा. काहीही खा. शरीराला योग्य व्यायाम नाही. पाण्याचे प्रमाण योग्य नाही. सामाजिक भान नाही. भूतदया नाही. कोरोना दाखवतोय यापुढे हे चालणार नाही. सुधारायच असेल तर पृथ्वीवर राहा अन्यथा.
कोरोना हे फक्त संकट नसून संधीही आहे. आपल्या शरीराच्या पलीकडे या ब्रह्मांडाचं शरीर आहे, ज्याने स्वतःमध्ये असणारी पृथ्वी स्वच्छ करायला हे कोरोना नावाचं खूपच कडवट अशं औषध घेतलं आहे, असंही काही वेळा वाटतं. कारण पृथ्वी ही ब्रह्मांडाचा अवयव आहे. मग पृथ्वीवर जी मनुष्यामुळे अस्वच्छता पसरली आहे ती स्वच्छ होणारच ना? आपण मनुष्य पृथ्वीवर स्वतःला विभक्त समजतो म्हणून बाकी दुनियेचं काहीही होवो, मला काय फरक पडणार. फरक पडणार आहे, कारण आपण एकाच ब्रह्मांडात एकाच पृथ्वीवर एकाच चैतन्यात जगत आहोत. ज्याला कॉमन काँशससनेस म्हणतात. एकत्व चैतन्य. ज्याचं कॉमन कर्म असतं. ते सर्वांवर असर दाखवते. यामुळे पृथ्वीवर एकाने केलेली चूक इतरही भोगतात.
अजूनही वेळ गेलेली नाही. मनुष्याने सुधारावे आणि निसर्गासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणावेत, अन्यथा हा कोरोना अलार्म ऐकला नाही, तर पुढचा काळ याहूनही कठीण होईल.
सर्वे भवंन्तु सुखीन:। सर्वे संतु निरामया।
(तन्वी भोसले या समाजमाध्यमांमधून वर्तमान विषयांवर आपली मत मांडतात.)