मुक्तपीठ टीम
सध्या बॅालिवूडचा चर्चेचा विषय म्हणजे येणाऱ्या नव्या पाहुण्यांची, अभिनेता-अभिनेत्रींच्या या गूड न्यूजसाठी त्यांच्या चाहत्यांना अधिकच उत्सुकता लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने सोमवारी एका मुलीला जन्म दिला आहे. करीना कपूर खानही लवकरच आई होणार आहे. आता चाहते प्रियांका चोपडाकडूनही गुडन्यूजची वाट पाहत आहेत. प्रियांकादेखील मुलांबद्दल खूप उत्सुक आहे. प्रियांकाने निक जोनाससह फ्यूचर फॅमली प्लॅनिंग केले आहे. तिला बरीच मुले हवी आहेत, जेणेकरून, ती एक क्रिकेट संघ बनवू शकेल. असे प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या दरम्यान ते आपले वैयक्तिक जीवन, लग्न, करिअर आणि बेबी प्लॅनिंग यावर खुलेपणाने बोलले.
मुलाखतीत प्रियांकाला तिच्या भावी कौटुंबिक नियोजनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रियांका चोप्रा म्हणाली, “मला क्रिकेट संघ बनवता येईल इतकी मुले हवी आहेत.
एंगेजमेंटच्या ५ महिन्यांनंतर प्रियांका आणि निकचे २०१८ मध्ये लग्न झाले. ३८ वर्षीय प्रियांकाने असेही म्हंटले आहे की, “जरी आमच्यात संस्कृतीची पार्श्वभूमी किंवा वयाचा फरक असला तरी तो माझ्या आणि निकच्या नात्यात कधीच आला नाही. आम्ही सामान्य जोडप्यांप्रमाणेच एकमेकांच्या सवयी समजून घेतो आणि आपल्या जोडीदाराला काय आवडते आणि काय नाही हे पाहतो. आम्ही या सगळ्याची अधिक काळजी घेत आहोत. आम्हा दोघांसाठी हे फार कठीण नाही. ”
प्रियांका म्हणाली की, “कोरोना साथीच्या काळात नातेसंबंधाचा नवा अर्थ तिला समजला. लॉकडाऊनमुळे आम्हाला बराच वेळ एकत्र घालविण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. कारण आम्हाला दोघांनाही वेळ नसतो त्यामुळे एकमेकांना वेळ देणे फार कठीण जाते.”
प्रियांकानेही आपल्या २८ वर्षीय पती निकच्या पाठिंब्याबद्दल प्रशंसा केली. ती म्हणाली की, मला निक सारखा जोडीदार मिळाल्याचा मला आनंद आहे. निक मला खूप साथ देतो. प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करतो. यासाठी मी निक ची आभारी आहे. “नुकतेच प्रियांका चोपडाने लंडनमध्ये ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि तिने ‘मॅट्रिक्स’चे शूटिंगही पूर्ण केले आहे.