मुक्तपीठ टीम
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. दरम्यान या कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. कोरोना लस उत्पादक कंपन्या फायझर आणि बायोनोटॅक यांनी लहान मुलांसाठी त्यांच्या कोरोना लसीला मंजुरी देण्याची विनंती युरोपियन मेडिसीन एजन्सी (ईएमए) यांना केली आहे. तसेच त्यासाठी अमेरिका आणि युरोपात आवश्यक प्रक्रिया सुरु केली आहे.
ईएमएने म्हटले आहे की, बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यात याव्यात. दोन्ही कंपन्यांनी १२ ते १५ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्या लसीला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.
लहान मुलांमध्ये लस १००% प्रभावी
- लहान मुलांमध्ये ही लस १००% प्रभावी आहे.
- कंपनीने म्हटले आहे की ईएमएची मान्यता युरोपच्या २७ देशांमध्ये लागू होईल.
- कंपनीने यापूर्वी आपत्कालीन उपयोगासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे विनंती केली आहे.
- उर्वरित जगामध्ये नियामक अधिकाऱ्यांसह अतिरिक्त सुधारणांची विनंती करण्यात येणार आहे.
- १२-१५ वर्षांच्या मुलांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
३ क्लिनिकल चाचण्यावर डेटा आधारित
- माहितीनुसार, निर्णय ३ क्लिनिकल चाचण्यांवरील डेटावर आधारित आहे.
- चाचणीत १२ ते १५ वर्षे वयोगटातील २,२६० सहभागींचा समावेश केला होता.
- ३१ मार्च २०२१ रोजी घोषित झालेल्या निकालांमध्ये असे आढळले आहे की, ARS-CoV-2 संसर्ग आणि अँटीबॉडीच्या तीव्र प्रतिक्रिया असलेल्या सहभागींमध्ये ही लस १०० टक्के प्रभावी होती.
- निवेदनात म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस लागू केल्यानंतर ही पुढील दोन वर्षे प्रभावी राहील.