मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीचा प्लॅन देताच एका आठवड्याच्या आत केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. एका आठवड्याच्या तत्परतेने पावले उचलत केंद्र सरकारने राज्य सरकारच्या वाढीव धान्य खरेदीच्या मागणीनुसार धान्यखरेदीला मंजुरी दिली आहे. हा शेतकरी हिताचा हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे राज्य भाजपने आभार मानले आहेत.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे तत्परतेबद्दल आभार मानतानाच राज्यातील आघाडी सरकारवर अक्षम्य दिरंगाईचा आरोपही केला आहे. केंद्र सरकारचा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांचा मोठा फायदा होईल, याबद्दल आनंद व्यक्त करत उपाध्ये यांनी राज्य सरकारची दिरंगाई या प्रकरणातील घटनाक्रमाद्वारे उघड केला आहे.
मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेले ट्वीट
राज्याच्या वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीचा प्लॅन देताच आठवड्याच्या आत @narendramodi सरकारने तत्परतेने पावले उचलत, राज्य सरकारच्या वाढीव धान्यखरेदीस मंजुरी दिली आहे. शेतकरी हिताचे हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री @raosahebdanve यांचे आभार -2 pic.twitter.com/cH5hlOIBFx
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 11, 2021
वाढीव मका व ज्वारी खरेदीची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्याचे वितरण कसे करणार याबाबत काही कळविले नव्हते. त्याची माहिती द्या तातडीने परवानगी देतो अशी तयारी केंद्र सरकारने दाखविली होती. मात्र हे वितरण नियोजनच राज्य सरकारांकडून कळविण्यात येत नव्हते. गेल्या वर्षीही ४ स्मरण पत्रे केंद्राने राज्य सरकारला पाठविली होती. मात्र शेतकऱ्यांच नुकसानीच सोयरसुतक राज्यसरकारला नव्हते. अखेर राज्य सरकारच्या अक्षम्य दिरंगाईनंतर ४ जानेवारी २०२१ रोजी राज्य सरकारक़डून वितरण नियोजनाचे पत्र पाठविण्यात आले व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रयत्नाने तातडीने केंद्र सरकारने परवानगी दिली, अशी माहितीही भाजपच