Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपाकडून कोरोना सेंटर्सची उभारणी पण सरकार मात्र घोषणा देण्याचे काम करतेय”: प्रविण दरेकर

May 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यात कोरोना सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याचाच भाग म्हणून या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारली जात आहेत. परंतु राज्यसरकार केवळ घोषणा देण्याचे काम करीत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतील उलवे नोड आणि जोगेश्वरी येथील कोरोना केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दरेकर बोलत होते. दरेकर म्हणाले, एका बाजूला सरकार घरात बसून घोषणा देण्याचे काम करत असताना, सरकार म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण करीत नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आपल्याला दिसून येईल.

भाजप कोरोना संकटकाळात गोरगरिबांसाठी, आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरून अनेक जिल्ह्यात स्वतः जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत आहेत. भाजपा लोकप्रतिनिधींकडून रुग्णांना मदत म्हणून अनेक कोरोना सेंटर्स उभारली जात आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावती येथे जाऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेमधील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला, २ दिवसांपूर्वी नाशिक येथे जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत तेथील आयुक्तांशी चर्चा करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मी स्वतः त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो, काल पालघर येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी करून अनेक बाबींची दखल आम्ही घेतली. ‘सरकार’ म्हणून ज्यांनी जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यकता होती ते घरात बसले असले तरी ते काम देवेंद्र फडणवीस कर्तव्य भावनेतून करीत आहेत. भाजपा या संकटकाळात जनतेच्या पाठीशी कायम राहील, असेही दरेकर म्हणाले.


Tags: corona care centerdevendra fadanvismumbaiPalgharpravin darekarप्रविण दरेकरमहाविकास आघाडी सरकारविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

ऑक्सिजनसाठी देश रडतोय…आयआयटी, आयआयएमकडे काम द्या, ते सरकारपेक्षा चांगलं करतील!”

Next Post

“माथाडी कामगारही ‘कोरोना योद्धे’ त्यांच्या मागण्यांकडे सरकारला डोळेझाक करता यणार नाही”-प्रविण दरेकर

Next Post
pravin darekar

"माथाडी कामगारही 'कोरोना योद्धे' त्यांच्या मागण्यांकडे सरकारला डोळेझाक करता यणार नाही"-प्रविण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!