मुक्तपीठ टीम
देशभरातील तज्ज्ञ, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांकडूनही करण्यात येत असलेली लॉकडाऊनची मागणी केंद्र सरकारने अद्याप स्वीकारलेली नाही. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देशाला केलेल्या संबोधनात अप्रत्यक्षरीत्या मांडलेली लॉकडाऊनविरोधी भूमिका असल्याचे मानले जाते. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ‘संपूर्ण लॉकडाउन’ असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत, अशी कडवट टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधींनी कोरोनाशी सामना करण्यासाठी निकृष्ट व्यवस्थापनासाठी जबाबदार असल्याचा आरोप करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव मार्ग आहे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे बरेच निरपराध लोक मरत आहेत.
I just want to make it clear that a lockdown is now the only option because of a complete lack of strategy by GOI.
They allowed, rather, they actively helped the virus reach this stage where there’s no other way to stop it.
A crime has been committed against India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2021
राहुल गांधी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना अनेक मार्ग सुचवत आहेत. तसेच ते कोरोना संसर्ग वाढीसाठी भाजप आणि केंद्र सरकारला जबाबदार ठरवत हल्लेही करत आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे २४ रूग्णांच्या मृत्यूला ‘हत्या’ संबोधले.
Died or Killed?
My heartfelt condolences to their families.
How much more suffering before the ‘system’ wakes up? pic.twitter.com/JrfZbIo7zm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 3, 2021
कोरोनाची वाढती भीषणता
- भारतात कोरोना नवी रुग्णसंख्या ३ लाख ५७ हजार २२९ नोंदवली गेली आहेत.
- देशात एकूण कोरोना संसर्गाने २ कोटींची संख्या ओलांडली आहे.
- या काळात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.