मुक्तपीठ टीम
सीरमचे सीइओ अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यावरूनच बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर सोडले आहे. अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर असून माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असं शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख SS असा केला. मात्र SS म्हणजे यांना शिवसेना वाटले, पुनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम कसे बरे करणार?, असे सांगत हा आरोप शिवसेनेला बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचे सांवत म्हणाले.
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’
पुनावाला यांना शिवसेनेने धमकी दिलेली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे भाजपाला सत्तेवर येण्याची घाई झालेली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने यांना चांगलाच धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच धडा दिला होता, असा टोला सांवत यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सांवत यांनी भाजपावर केली आहे.
BJP leaders who are eager to defame @Shivsena, INTROSPECT & THINK BEFORE you REACT! https://t.co/uOFg3ZHTJQ
— Arvind Sawant (@AGSawant) May 3, 2021
राज्यात सत्तांतर होईल असे पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे, या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवालही सावंत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.